जळगावराजकीय

जनकल्याणाची कामे केल्याने पुन्हा एकदा विजयासाठी जुन्या गावात नागरिकांनी दिले शुभाशीर्वाद

जळगाव प्रतिनीधी। महायुतीचे उमेदवार आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रचारार्थ पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शनिवारी संध्याकाळी दुसऱ्या टप्प्यात तुकारामवाडी, जानकी नगर, गणेशवाडी मार्गे पंचमुखी हनुमान मंदिर येथे संवाद रॅली काढली. जळगावकरांकडून आमदार भोळे यांना भरभरून प्रेम मिळत आहे. रॅलीत ‘भारत माता कि जय’, ‘महायुतीचा विजय असो’ अशा विविध घोषणा दिल्या जात असून या घोषणांनी शहर दणाणले आहे. यावेळी आ. राजूमामा भोळे यांनी शहरात जनकल्याणाची कामे अधिक जोमाने करण्याचा निर्धार व्यक्त केला.

रॅलीमध्ये खा. स्मिता वाघ, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, मंडळ क्रमांक ७ चे अध्यक्ष गोपाल पोपटानी, माजी नगरसेवक मंगला चौधरी, शिवसेनेचे माजी नगरसेवक कुंदन काळे, ॲड.शुचिता हाडा, मनोज आहुजा, माजी महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, प्रदीप रोटे, मंडळ सरचिटणीस विनय केसवानी, महेश पाटील, संदीप बाविस्कर, योगेश बागडे, हेमंत जोशी, प्रसन्न बागल, भूषण काकडे, विजय पाटील, दिनेश प्रजापत, सौरभ महाजन, सुशील जगताप, पंकज गागडे, नंदिनी दर्जी, कल्पना मावळे, उषा परदेशी, ज्ञानेश्वरी कांडेलकर, शिवसेनेचे पियुष कोल्हे, स्वप्नील परदेशी, उमेश सोनवणे, अमर ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अर्चना कदम, ममता तडवी, रिपाई आठवले गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, प्रताप बनसोडे, मिलिंद अडकमोल, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजू मोरे, महानगर जिल्हाध्यक्ष कल्पेश मोरे, लोकजनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दही खाऊ घालत विजयासाठी दिले आशीर्वाद …
शनिवारी सायंकाळी पांडे डेअरी चौकातील रामदेव बाबा मंदिर येथे दर्शन घेऊन आ. भोळे यांनी भेटींना सुरुवात केली. तेथून तुकाराम वाडी, महादेव मंदिर परिसर, जानकी नगर, गणेशवाडी, मंजुषा हौसिंग सोसायटी, कासम वाडी मार्गे पंचमुखी हनुमान मंदिर येथे समारोप करण्यात आला. रॅलीदरम्यान आ. भोळे यांनी महेश पाटील, शांताराम सूर्यवंशी, वृत्तपत्र विक्रेते विलास वाणी आदींच्या घरी भेटी दिल्या. तसेच, जानकी नगरात मोठे भाऊ अरुण भोळे यांनी त्यांना गोड दही खाऊ घालून विजयासाठी आशीर्वाद दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button