जळगाव

जैन इरिगेशनच्या सैय्यद मोहसिनला विजेतेपद

जळगांव (प्रतिनिधी) : येथील तमन्ना क्रीडा संस्था, तांबापुर तर्फे दिनांक ३ व ४ नोव्हेंबर दरम्यान संपन्न झालेल्या खुल्या पुरूष एकेरी कॅरम स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जैन इरिगेशनच्या सैय्यद मोहसिन याने जैन इरिगेशनच्याच नईम अन्सारीचा २-१ सेटने पराभव करून विजेतेपदासह रोख रुपये ७०००/- आणि चषक पारितोषिक स्वरूपात प्राप्त केले. नईम अन्सारी यास रोख रुपये ४०००/- व चषक बक्षिस मिळाले.
तत्पूर्वी पहिल्या उपांत्य सामन्यात नईम अन्सारीने रईस शेख( तांबापूर) याचा तर सैय्यद मोहसिनने धुळेच्या निसार अहमदचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
स्पर्धेत ३ ते ८ क्रमांकाचे पारितोषिक सर्वश्री निसार अहमद, रईस शेख, मुस्तुफा शेख ( तालुका कॅरम असो. नशिराबाद), योगेश धोंगडे ( जळगांव), हसन खान ( मनमाड) आणि शेख हबीब ( प्लाझा, जळगांव) यांनी पटकाविले. स्पर्धेत जळगाव सह धुळे,मालेगाव, सुरत, मनमाड, भुसावळ, सावदा, मलकापूर, अकोला नसीराबाद ,अंमळनेर व इत्यादी ठिकाणाहून एकूण ७० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.
स्पर्धेला अक्षय वंजारी यांनी पुरस्कृत केले होते.
अंतिम सामना संपल्यानंतर लगेच पारितोषिक वितरण करण्यात आले. ह्या प्रसंगी सर्वश्री रोशन शेख, महेश सोनवणे, झाकीर बागवान, शेख शेरू अताऊल्लाह खान व इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वितेसाठी सर्वश्री शेख युनूस, अय्युब खान,आरिफ शेख, चिराग शेख, नईम अन्सारी, रईस शेख, इकबाल खान, सोनू शेख, दानिश शेख, रेहान खान, इकबाल मुर्गिवाले यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button