पालकमंत्री यांच्या हस्ते शिवाजी नगरात विकास कामांचे भूमिपूजन व शालेय वस्तूंचे वाटप
शिवाजी नगरात विकास कामांचे भूमिपूजन व शालेय वस्तूंचे वाटप
टीम आवाज मराठी जळगाव । दि १ जुलै २०२३। येथील जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक २ मधील विकास कामांचे तसेच विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप कार्यक्रम दिनांक ३०/६/२०२३ रोजी शिवाजी नगरात क्रांती चौकात मा. पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते सायंकाळी ६ वाजता संपन्न झाला.
कार्यक्रम प्रसंगी माजी महापौर अशोक सपकाळे, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, दिलीप पोकळे, गणेश सोनवणे, कुंदन काळे, अतुषे पाटील, प्रतिभा देशमुख, ज्योती शिवदे, जोत्स्ना दारकुंडे, आबा बाविस्कर, मजहर पठाण, अतुल हराळ, संजय अकोलकर, गणेश कोळी, हिरामण तरटे, श्रीकांत सोले, पिंटू कोळी, बाबू शेख, फिरोज पठाण, भैय्या पालोदकर, व इतर मान्यवर उपस्थित होते शिवाजी नगरातील रस्त्यांचे भूमिपूजन व गोर गरिबांचे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप पालकमंत्री व इतर मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवाजी नगरातील सामाजिक कार्यकर्ते, श्री गणेश क्रीडा संस्था व श्रीगुरुदत्त संस्थेचे सर्व पदाधिकारी व प्रभागातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.