जळगावः पोलिसांकडून सीमावर्ती भागात नाकाबंदी करत वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात पोलिसांकडून सुरु असताना तपासणीत एका कारमध्ये ६३ लाखांची रोकड मिळून आली आहे.दरम्यान दोन दिवसांपूर्वीच अमळनेर तालुक्यात कोटीची रोकड सापडली होती.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर पोलीस प्रशासन सज्ज असून ठिकठिकाणी नाकाबंदी करत वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.याच नाकाबंदी केली जात आहे. जळगाव तालुक्यातील कासोदा येथे दीड कोटी रुपये तर अमळनेर तालुक्यातील चोपडाई येथे १६ लाख ३८ हजाररुपये सापडून आले होते. यानंतर पुन्हा एकदा जळगाव शहरात ६३लाखांची रोकड सापडून आल्याने जळगावात खळबळ उडाली आहे.
शहरातील आकाशवाणी चौकात पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी दरम्यान रोखण्यात आलेल्या एका कारमध्ये रोकड आढळून आली आहे. पोलिसांनी हि रोकड जप्त करून मुद्देमाल जमा करण्यात आला आहे.