जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून यात जळगाव जिल्ह्यातील तीन उमेदवारांचा समावेश आहे. माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, रोहिणी खडसे आणि दिलीप खोडपे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आले असून आज जिल्ह्यातील आणखी दोन उमेदवारांची नावे शरदचंद्र पवार गटाकडून जाहीर करण्यात येणार आहे.
शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत ४५ उमेदवारांची नावे असून जळगाव ग्रामीणमधून माजी मंत्री गुलाबराव देवकर, मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे, जामनेरमधून दिलीप खोडपे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.