एल. के फाउंडेशनतर्फे मेहरूण तलावावर ५१ फुटी रावणाचे दहन
जळगाव : एल. के फाउंडेशनतर्फे मेहरूण तलावावर ५१ फुटी रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री आठ वाजता मान्यवरांच्या उपस्थित रावणाचे दहन करण्यात आले.
दर वर्षीप्रमाणे विजयादशमीनिमित्त एल. के फाउंडेशनतर्फे मेहरूण तलावावर रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन, माजी महापौर आशा कोल्हे, सिंधू कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिषेक पाटील, योगेश देसले, माजी महापौर ललित कोल्हे, चंदन कोल्हे, माजी नगरसेवक प्रशांत नाईक, नितीन बरडे, प्रविण कोल्हे, डॉ. वैभव पाटील, पीयूष कोल्हे, संतोष पाटील, पोलीस उप अधीक्षक संदीप गावीत आदी उपस्थित होते.
जळगावातील कारागिराने ५१ फुट उंचीचा रावण तयार करण्यात आला होता. तसेच या कार्यक्रमासाठी संगमनेर येथील टीमकडून फटाक्यांचा फायर शो सादर करण्यात आला. या फायर शो ने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते.