Blogजळगावमुंबईराज्य

भारतीय रेल्वेकडून २६ अतिरिक्त उत्सव विशेष रेल्वे गाड्या

टीम आवाज मराठी,भुसावळ/जळगाव दि. 12 ऑक्टोबर 2024 (वृत्तसंस्था ) ;-  आगामी सणोत्सव लक्षात घेऊन प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे दसरा, दिवाळी आणि छट या सणांसाठी 26 अतिरिक्त उत्सव विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.

मलाबार गोल्ड अँड डायमंड्स … आजचा रंग मोरपंखी…
मलाबार गोल्ड… आजचा रंग लाल

दादर-काजीपेट साप्ताहिक विशेष गाडीच्या 10 फेर्‍या होतील. साप्ताहिक विशेष गाडी 17 ऑक्टोबर ते 28 नोव्हेबरपर्यंत दर गुरुवारी दादर येथून दुपारी 3.25 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी दुपारी 12.50 वाजता काजीपेट येथे पोहोचेल. या गाडीच्या पाच फेर्‍या होतील. साप्ताहिक विशेष गाडी . 16 ऑक्टोबर ते 27 नोव्हेबरपर्यंत दर बुधवारी काजीपेट येथून संध्याकाळी 5.5 वाजता सुटेल आणि दादर येथे दुसर्‍या दिवशी दुपारी 1.25 वाजता पोहोचेल. या गाडीच्या पाच फेर्‍या होतील. ही गाडी कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, नागरसोल, रोटेगांव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा, हुजूरसाहेब नांदेड, मुदखेड, उमरी, धर्माबाद, बासर, निझामाबाद, आर्रमुर, मेटपल्ली, कोराटला आणि लिंगमपेट जगीत्याल येथे थांबेल. दादर-काजीपेट साप्ताहिक विशेष गाडी बल्लारशाहमार्गे धावणार आहे, या गाडीच्या 16 फेर्‍या होतील. साप्ताहिक विशेष गाडी 13 ऑक्टोबर ते 1 डिसेंबरपर्यंत दर रविवारी दादर येथून दुपारी 3.25 वाजता सुटेल आणि काजीपेट येथे दुसर्‍या दिवशी रात्री 9.30 वाजता पोहोचेल. या गाडीच्या 8 फेर्‍या होतील. साप्ताहिक विशेष गाडी 12 ऑक्टोबर ते 30 नोव्हेबरपर्यंत दर शनिवारी काजीपेट येथून सकाळी 11.30 वाजता सुटेल आणि दादर येथे दुसर्‍या दिवशी दुपारी 1.25 वाजता पोहोचेल. या गाडीच्या 8 फेर्‍या होतील. कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, नगरसोल, रोटेगांव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा, हुजूर साहेब नांदेड, मुदखेड, भोकर, हिमायतनगर, सहस्रकुंड, किनवट, आदिलाबाद, पिंपळखुटी, लिंगटी, कायर, वणी, भांदक, चंद्रपूर, बल्लारशाह, सिरपुर कागजनगर, बेल्लमपल्ली, मंचिर्याल, पेड्डापल्ली आणि जम्मीकुंटा येथे थांबेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button