मुंबई -प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा यांचं मुंबईत निधन झालं. सोमवारी ( 7ऑक्टोबर) नियमित तपासणीसाठी रतन टाटा रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला. भारत सरकारने रतन टाटा यांना पद्मविभूषण देऊन सन्मानित केले होते.टाटा समूहासाठी रतन टाटा हे एका अध्यक्षापेक्षा अधिक होते. माझ्यासाठी ते एक मार्गदर्शक आणि मित्र होते. त्यांनी स्वतःच उदाहरण जगासमोर ठेवून इतरांना प्रेरणा दिली. त्यांच्या नेतृत्वात टाटा समूहाने नेहमी उत्कृष्टता, सचोटी आणि नाविन्यपूर्णतेसाठी वचनबद्धता दाखवली. समूहाच्या नैतिकतेशी कुठेही तडजोड न करता टाटा समूहाने जागतिक स्तरावर ठसा उमटवला.”