जळगाव (प्रतिनिधी) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विचारधारा प्रशाळेअंतर्गत महात्मा गांधी अध्ययन व संशोधन केंद्रातर्फे झालेल्या गांधी सप्ताहात अमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्रात माजी कुलगुरू प्रा. एन.के. ठाकरे यांचे व्याख्यान झाले.
गांधी प्रभाव : लगे रहो निंबाभौ या विषयावर व्याख्यान देतांना प्रा. ठाकरे यांनी गांधी विचारांचा प्रभाव असल्यामुळे विद्यापीठाच्या उभारणीत नवे व सत्याच्या अधारावर प्रयोग केले असे स्पष्ट केले. प्रशाळेचे प्रभारी संचालक तथा व्य. प. सदस्य प्रा. म.सु. पगारे यांनी अध्यक्षीय भाषणात गांधी विचार या देशाच्या मातीतून उगवणे आणि पेरला जाणे हे देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी महत्वाचे असल्याचे सांगितले. यावेळी तत्त्वज्ञान केंद्राचे मानद संचालक डॉ.डी.एच. भावसार, अधिसभा सदस्य डॉ. संदीप नेरकर, रा.से.यो. संचालक डॉ. सचिन नांद्रे, प्राचार्य व्ही.एन. पाटील, डॉ. मनीष करंदे उपस्थित होते. विभाग प्रमुख उमेश गोगडिया यांनी प्रास्ताविक केले. डॉ. हेमंत पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.