करमाड विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळा
विद्यार्थ्यांसह गावातील नागरिकांनी देखील घेतला सहभाग
टीम आवाज मराठी, करमाड (ता. पारोळा)। २९ जून २०२३ । येथील माध्यमिक विद्यालय व किमान कौशल्य विद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाच्या प्रांगणात पालखीचे पूजन मुख्याध्यापक जी व्ही जाधव यांनी केले.
गावातील भजनी मंडळाने सादर केलेल्या विविध भजनांच्या व गीताच्या माध्यमातून पालखीची मिरवणूक विद्यालयापासून गावात नेण्यात आली. विद्यार्थ्यांनी केलेल्या वारकऱ्यांची वेशभूषा आकर्षक ठरत होती. गावातील ग्रामस्थ भक्तिभावाने पालखीचे दर्शन घेऊन पालखी सोहळ्यात सहभागी होत होते.
विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी पालखी सोहळ्यात सहभाग घेऊन विविध भजनांवर ठेका धरला फुगड्या घेतल्या. यावेळी विद्यालयाचे शिक्षक एन जे पाटील, आर एच पाटील, व्ही पी पाटील, बी बी पाटील, एस डी पाटील, नंदकुमार पाटील, अजय पाटील, जे. बी. पाटील,एन वाय पाटील, डी बी पाटील, श्रीमती वाय आर वाडीले, संतोष पाटील, गावातील भजनी मंडळातील सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते.