टीम आवाज मराठी, जळगाव दि. 04 ऑक्टोबर 2024 :- लग्नाचे आमिष दाखवून एका 26 वर्ष विवाहितेवर अत्याचार करून ती गर्भवती झाल्याची धक्कादायक घटना शहरातील एका परिसरात उघडकीस आली असून याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून शनिपेठ पोलीस स्टेशनला 3 रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की शहरातील एका परिसरात राहणाऱ्या 26 वर्षीय विवाहिता हिचे पतीशी पटत नसल्याने याचा फायदा उचलत संशयित तुषार राजेंद्र अहिरे वय 28 याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला.
तसेच या अत्याचारातून विवाहिता ही गर्भवती झाल्याने तिने लग्नासाठी तुषार याच्याकडे विचारणा केली असता त्याने तिला नकार दिल्याने विवाहितेने शनिपेठ पोलीस स्टेशन गाठून संशयित तुषार अहिरे यांच्या विरुद्ध तक्रार दिल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान मे 2018 पासून हा प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. याबाबत तपास डीवायएसपी संदीप गावीत हे करीत आहे.