चोपडा -घटस्थापनेची तयारी करीत असताना एका 19 वर्षीय युवकाचा विजेचा धक्का लागल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील गरताड येथे दोन रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
केतन समाधान पाटील असे मृत युवकाचे नाव आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, फार्मसी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या गरताड येथील केतन समाधान पाटील हा नवरात्र उत्सवानिमित्त घटस्थापनेची तयारी करीत असताना त्याला विजेचा शॉक बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना दोन रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर केतन पाटील याला तात्काळ चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.
दरम्यान केतन पाटील हा एकुलता एक मुलगा असल्याने गावात शोककळा पसरली असून याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.