टीम आवाज मराठी, जळगाव दि. 03 ऑक्टोबर 2024 : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील संगणकशास्त्र प्रशाळेत दि. २९ सप्टेंबर २४ रोजी संगणक शास्त्र प्रशाळेत एम.सी.ए., एम.एस.सी., कॉम्प्युटर सायन्स, एम.एस.सी., इन्फॉरमेशन टेक्नॉलाजी च्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. सुरवातीला संगणक शास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ.राकेश रामटेके यांनी रिबीन कापून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
यावेळी संगणक शास्त्र शाखा प्रशाळेचे संचालक प्रा.आर.जे.रामटेके, प्रा.डॉ.अजय सुरवाडे, प्रा.राजु आमले, प्रा.राम भावसार, डॉ.मनिषा देशमुख, शुभांगी सपकाळे, वृंदा पाटील, राकेश गेडाम, डॉ.घनश्याम रामटेके, गिरीश चाटे, प्रतिभा पवार, प्रा.कापसे, डॉ.संदीप भामरे आदी प्राध्यापक यांची उपस्थिती होती. प्रथम वर्षामधुन वैभव पाटील यांची मिस्टर फ्रेशर्स व मानसी राजेंद्र जोशी हिची मिस्टर फ्रेशर्स म्हणून निवड करण्यात आली. तसेच एम.एस.सी. कॉम्प्युटर सायन्स प्रथम वर्ष यामधुन अक्षय पाटील व चंचल बडगुजर यांची मिस्टर फ्रेशर्स व मिस्टर फ्रेशर्स म्हणून निवड करण्यात आली. एम.एस.सी. इन्फॉर्मेशन टेक्नॉलाजी प्रथम वर्ष यामधुन भगवान लांडगे व रिना पाटील यांची मिस्टर फ्रेशर्स व मिस फ्रेशर्स म्हणून निवड करण्यात आली.
कॉम्प्युटर सायन्स द्वितीय वर्षातील विद्यार्थी रोहीत कोकणी यांनी बासरी वादनाने विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करुन कार्यक्रमाची रंगत व शोभा वाढवली. या कार्यक्रमाचे नियोजन द्वितीय वर्षांचे विद्यार्थी हिमांशू निकुंभ, भावेश पाटील, प्रितेश पाटील, अभय सोनवणे, रेवती फिरके, प्रियांका मराठे, रोहित पाटील, रोहिणी पाटील, रुपल पाटील, हर्षाली पाटील, कृतिका पाटील यांनी केले.