जळगाव-येथील नवीन बस स्टॅन्ड येथे एका बसमध्ये चढत असताना महिलेच्या पर्सची चैन उघडून 21 हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना 28 सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की वाघ नगर परिसरात राहणाऱ्या मनीषा दिनेश पाटील या 28 सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास नवीन बस स्थानकात आले असता त्या अमळनेर शिंदखेडा बस क्रमांक एम एच 14 बीटी 13 51 मध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या वरची चैन उघडून 21 हजार रुपयांची रोकड लांबविले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मनीषा पाटील यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र ठाकरे करीत आहे.