जळगाव : पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेवर अत्याचार केल्याची घटना 17 सप्टेंबर रोजी उघडकीस आली असून याप्रकरणी 30 रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला 17 सप्टेंबर रोजी सुभाष चव्हाण याच्या घरी पाणी भरण्यासाठी गेली होती. यावेळी सुभाष चव्हाण हा घरात असल्याने त्याने दरवाजा बंद करीत महिलेशी जबरदस्ती करण्याचा प्रयन केला. तसेच महिलेने प्रतिकार केला असता तिला धमकावत तिच्यावर अत्याचार केला. महिलेने आरडाओरड केल्यानंतर तिचा पती तेथे गेला असता चव्हाण तेथून पळून गेला. या प्रकरणी महिलेने दि. ३० सप्टेंबर रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सुभाष चव्हाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.