जळगाव

‘अनुभूती बालनिकेतन’द्वारे संस्कारशील समाज घडविण्याची प्रेरणा – सेवादास दलिचंद ओसवाल

मॉन्टेसरी पद्धतीच्या अनुभूती बालनिकेतनचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

आवाज मराठी जळगाव दि. ४ – ‘जगात जे जे चांगले आहे त्याचे आपल्या गावाला, समाजाला फायदा होऊन पुढची पिढी घडावी या उद्देशाने भवरलाल जैन यांनी अनुभूती निवासी स्कूलची स्थापना केली. त्याच विचारातून संस्कारशील समाज निर्मितीची प्रेरणा देणारी अनुभूती बालनिकेतन ही मॉन्टेसरी पद्धतीने सुरू केली. हा आनंद म्हणजे भवरलाल जैन यांच्या स्वप्नपूर्तीचा आहे’असे मनोगत सेवादास दलिचंद ओसवाल यांनी व्यक्त केले.

मॉन्टेसरी स्कूल ‘अनुभूती बालनिकेतन’ सुरू करण्यात आली. त्याच्या कोनशिला अनावरण व उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मदनलाल देसर्डा, रोहित बोहरा, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, राजेंद्र मयूर, रमेशदादा जैन उपस्थित होते. यांच्यासह जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन, अनुभूती बालनिकेतनच्या प्रमुख गायत्री बजाज, डॉ. विश्वेश अग्रवाल, प्रा. अनिल राव, भरत अमळकर, प्रदीप रायसोनी, डॉ. शेखर रायसोनी, डॉ. वर्षा पाटील, मधुभाभी जैन, डॉ. राहुल महाजन, अनिष शहा, यांच्यासह जैन परिवारातील सदस्य उपस्थित होते.

अंबिका जैन यांनी प्रास्ताविकातून अनुभूती बालनिकेतन सुरु करण्याबाबतचा उद्देश सांगितला. महात्मा गांधीजींच्या विचारांच्या धर्तीवर भावनिकदृष्ट्या समाजाची निर्मिती व्हावी आणि एक दुसऱ्यांकडून शिकण्याची वृत्ती निर्माण व्हावी याच विचारधारेतून अनुभूती बालनिकेतनची सुरवात केल्याचे  अंबिका जैन यांनी सांगितले.
भवरलालजी जैन यांच्या ‘सार्थक करुया जन्माचे, रुप पालटू वसुंधरेचे’ या विचारांचे प्रतिक म्हणजे अनुभूती बालनिकेतन असल्याचे रोहित बोहरा यांनी म्हटले.
गायत्री बजाज यांनी मॉन्टेसरी तत्वज्ञान काय आहे हे सांगितले. भारतीय गुरूकूल पद्धतीला पुन्हा मजबूत करण्यासाठी वेगळे काही करता येईल का हा विचार करत होते त्याचे स्वप्न अशोक जैन यांच्यासह जैन परिवाराच्या प्रयत्नातून पुर्ण झाल्याचे सांगितले.

कार्यक्रमाची सुरवात हरिहंतो भगवतो.. या मंत्राने दलिचंद ओसवाल यांनी केली. अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इतनी शक्ती हमें दे ना दाता.. हम होंगे कामयाब हे गीत म्हटले. राष्ट्रगीताने समारोप झाला.

चौकट…

अनुभूती बालनिकेतनचे वैशिष्ट्ये
‘अनुभूती बालनिकेतन’ मध्ये ३ ते ६ मिश्र वयोगटातील विद्यार्थी खेळता-खेळता आपल्या निरीक्षणातून क्रियाशीलतून, स्वयंशिस्तेतून संस्कारीत होतील. शिक्षणाविषयी आवड निर्माण होऊन आनंदाने ते बदल स्वीकारतील अशी शिक्षणपद्धती आहे. आजूबाजूच्या पर्यावरणासह आपल्यापेक्षा मोठ्यांकडून परस्परभावनेतून, व्यवहार ज्ञानासह आचरण करण्याची शिकवण घेता येईल. स्वयंनिरीक्षणातून, प्रात्यक्षिक शिक्षणातून पुस्तकांविना मुलांच्या बुद्धिकौशल्याचा विकास करण्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या असलेल्या यथोचित वस्तू वेगवेगळ्या देशांतून ‘अनुभूती बालनिकेतन’ येथे उपलब्ध करुन दिल्या आहेत. खेळता-खेळता टेबल लर्न करणे, वाचता-वाचता Vocabulary (शब्दसंग्रह) वाढविणे, शब्दांची आणि वाक्यांची रचना करणे, जगाच्या नकाशातून भुगोल शिकणे, पेन-पेन्सील व कागदाचा अचूक वापर करून अक्षरांची ओळख करणे, गणितांचे कोडे सोडणे, जड फर्निचरच्या जागी, मुलांना सहजपणे हलवता येतील अशा लहान मुलांच्या आकाराच्या टेबल आणि खुर्च्या, लहान मुलांचा सहजपणे हात पोहोचू शकेल अशी लहान आकाराची कपाटे अश्या अनेक गोष्टी येथे आहेत. फुलांची रचना करणे, हात धुणे, जिम्नॅस्टिक्स, स्वयंपाक करताना भाजीपाला निवडणे, धान्य निवडणे, बटन लावणे यासारख्या प्रत्यक्ष कृतींचा समावेश अनुभूती बालनिकेतनमधील शिक्षणामध्ये केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button