जळगाव

जळगाव जिल्हा मानांकन पुरुष एकेरी कॅरम स्पर्धेत जैन स्पोर्टस अॅकडमीचे सैय्यद मोहसीन प्रथम

विजयी खेळाडूंची मुंबईच्या स्पर्धेसाठी निवड

आवाज मराठी जळगाव दि. ४  – महाराष्ट्र कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने व जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशन आयोजित स्व. ॲड. बबनभाऊ बाहेती यांच्या स्मरणार्थ ३० ते ३१ जुलै दरम्यान कांताई हॉल येथे जिल्हा कॅरम स्पर्धेचे आयोजन केले होते. पुरुष एकेरी आणि १८ व २१ वयोगटाखालील मूलं एकेरी चाचणी निवड अशा दोन गटांमध्ये हि स्पर्धा झाली. अॅड. रोहन बाहेती यांच्या पुढाकाराने पुरुष एकेरीतील सर्व विजेत्या खेळाडूंसाठी रोख पारितोषिके देण्यात आलीत.पारितोषीक वितरणाप्रसंगी ॲड. रोहन बाहेती, अरविंद देशपांडे, ॲड. रवींद्र कुळकर्णी, रोहित कोगटा, अरुण गावंडे उपस्थित होते.

पुरुष एकेरी स्पर्धेत प्रथम आलेल्या जैन स्पोर्टस अॅकडमीचे सय्यद मोहसीन यांनी ३००० रोख पारोतोषिकाने, नईम अन्सारी द्वितीय याला २००० हजार रुपये रोख, तृतीय आलेल्या अताउल्लाह खान ( प्लाझा क्रीडा संस्था) व चतुर्थ आलेल्या हबीब शेख ( एकता क्रीडा मंडळ) यांना १५०० रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. शाहरुख शेख पिंप्राळा हुडको, रईस शेख तमन्ना क्रीडा संस्था, नदीम शेख बिजली क्रीडा संस्था, मुबश्शिर सय्यद प्लाझा क्रीडा संस्था हे सुद्धा विजयी झालेत. विजयी झालेल्या खेळाडूंची मुंबई येथे दि. १५ ते १८ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या ५८व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेकरता जळगाव जिल्हा संघात निवड झाली आहे.

याच स्पर्धेतून दि. ६ ऑगस्ट रोजी मुंबईला होणाऱ्या १८ व २१ वर्ष वयोगटाच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेकरिता यश धोंगडे, देवेंद्र शिर्के, हुझेफा शेख, उम्मेहानी खान, दुर्गेश्वरी धोंगडे आणि दानिश शेख यांची जळगाव जिल्हा संघात निवड झाली आहे. स्पर्धेचे प्रमुख महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष मंजूर खान, प्रमुख पंच अब्दुल क़य्यूम ख़ान व शेखर नार्वरिया यानी काम पाहीले. जळगाव जिल्हा कॅरम संघटनेचे शाम कोगटा व नितिन बरडे यानी सर्व विजयी खेळाडूंचे कौतूक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button