जळगाव
आ.भोळे यांनी गिरवले योगाचे धडे
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमात आमदारांनी लावली हजेरी
टीम आवाज मराठी जळगाव । २१ जून २०२३ । आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जळगाव शहरात विविध ठिकाणी
आयोजित करण्यात आलेल्या योगा कार्यक्रमात जळगाव शहराचे आमदार सुरेश दामु भोळे यांनी हजेरी लावली.
२१ जून हा दिवस “आंतरराष्ट्रीय योग दिन” म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे हास्य परिवार तर्फे योग दिन साजरा करण्यात आला. आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी कार्यक्रमात उपस्थित राहून हास्य परिवारातील सहकाऱ्यासोबत योगाचे विविध प्रकार समजावून घेतले, व त्याचा सराव देखील केला.
यावेळी बोलताना आमदार सुरेश गोळे यांनी सांगितले की, शरीराला मानसिक शांतता प्राप्त करण्यासाठी योगांचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे नियमित योगा करणे आपल्या स्वास्थ्यासाठी फायदेशीर आहे. अशी भावना भोळे यांनी व्यक्त केली.