जळगाव

पहिल्या शालेय जैन चॅलेंज चषक तायक्वांडो स्पर्धेत खेळाडूंकडून पदकांची कमाई

टीम आवाज मराठी जळगाव-प्रथम पहुरची सावित्रीबाई फुले शाळा, द्वितीय ऐनपूरची सरदार पटेल विद्यालय तर तृतीय जळगावची अनुभूती निवासी स्कूल विजयी

जळगाव दि. २६ प्रतिनिधी – पहिल्या जैन चॅलेंज तायक्वांडो स्पर्धेचे आयोजन दि. २५ फेब्रुवारीला केले होते या स्पर्धा अनुभूती इंटरनॅशनल निवासी स्कूलमधील बॅडमिंटन हॉल येथे घेण्यात आल्या. या स्पर्धेत रावेर, जामनेर, जळगाव, शिरसोली, पाचोरा, चाळीसगाव येथील विविध शाळेतील १६० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. तायक्वांडो स्पर्धेत सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळा पहुर प्रथम, सरदार वल्लभ भाई पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ऐनपुर ता. रावेर द्वितीय क्रमांक तर अनुभूती इंटरनॅशनल निवासी स्कूल यांनी तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेचे उद्घाटन बास्केटबॉल राष्ट्रीय खेळाडू व जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे सहसचिव रवींद्र धर्माधिकारी यांच्या हस्ते झाले होते. पारितोषीक वितरण अनुभूती निवासी स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन यांच्याहस्ते झाले. यावेळी खेळाडूंना पदकं व बेस्ट फायटर तसेच विजेत्यांना चषक देण्यात आले.

स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे –

मुलींच्या गटात – १६ किलो आतील दिशा सोनवणे, १८ किलो विधी कल्याणकार, २० किलो आतील मानसी करांडे, २२ किलो आतील दिशा रणसिंग, २४ किलो आतील वैष्णवी इंगळे, २६ किलो आतील मोहिनी राऊत, २९ किलो आतील नेहा बनकर, ३२ किलो आतील खुषी बारी, ३५ किलो आतील साची पाटील, ३८ किलो आतील अनुभूती चौधरी, ३८ किलो वरील स्वाती चौधरी विजयी झालेत.

मुलांच्या गटात – १८ किलो जियांश जोशी, २१ किलो आतील निभय लोखंडे, २३ किलो आतील आर्यन वानखेडे, २५ किलो आतील रोशन भवरे, २७ किलो आतील आर्यन गाढे, २९ किलो आतील गुरू कारंडे, ३२ किलो आतील भावेश निकम, ३५ किलो आतील कार्तिक पाटील, ३८ किलो अर्थव सोनार, ४१ किलो आतील हार्दिक जैन, ४१ किलो वरील अमर शिवलकर विजयी झालेत.

१७ वर्ष मुलांच्या गटात :- ३५ किलो आतील सोहम कोल्हे, ३८ किलो आतील सतीष क्षीरसागर, ४१ किलो आतील कविश जैन, ४५ किलो आतील मुकेश भोई, ४८ किलो आतील साई निळे, ५१ किलो राजरत्न गायकवाड, ५५ किलो आतील भावेश चौधरी, ५९ किलो आतील लोकेश महाजन, ६३ किलो आतील प्रबुद्ध तायडे, ६३ वरील प्रतिक वंजारी विजयी झालेत.

१७ वर्ष मुली :- ३२ किलो आतील गायत्री धनगर, ३५ किलो वैष्णवी जाधव, ३८ किलो प्राचल कोळी, ४२ किलो आतील कोमल गाढे, ४४ किलो आतील तनुजा राऊत, ४६ किलो आतील समृद्धी कुकरेजा, ४९ किलो आतील जागृती चौधरी, ५२ किलो आतील प्राप्ती गुगाले, ५५ किलो आतील इष्णवी भाऊका, ५५ वरील प्रेरणा जाधव यशस्वी झालेत. तर १४ वर्ष मुलांमध्ये अर्थव सोनार व मुलींमध्ये स्वाती चौधरी तर १७ वर्ष मुलांमध्ये सोहम कोल्हे व मुलींमध्ये प्राप्ती गुगाले यांना बेस्ट फायटर पुरस्काराने सन्मानित केले गेले.
खेळाडूंना प्रशिक्षक जयेश बाविस्कर, जयेश कासार, जीवन महाजन, स्नेहल अट्रावलकर, सुनील मोरे, श्रीकृष्ण देवतवाल, योगिता सुतार, हरीभाऊ राऊत, शुभम शेटे, विजय चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धा यशस्वीतेसाठी जयेश बाविस्कर, श्रेयांग खेकारे, दानिश तडवी, यश शिंदे, अमोल जाधव, निलेश पाटील, हिमांशू महाजन, ईश्वर क्षिरसागर, स्मिता काटकर, संतोषी, सन्नी सालीपुत्त यांनी सहकार्य केले. विजेते खेळाडूंना अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललित पाटील, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, सहसचिव रवींद्र धर्माधिकारी, सचिव अजित घारगे, महेश घारगे, नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे यांनी शुभेच्छा दिल्यात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button