जळगाव दि. ९ प्रतिनिधी- जैन इरिगेशनच्या सहकार्यातून जैन स्पोर्टस् अकाडमी व जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे २१ वी १४ वर्ष वयोगटाखालील जैन चॅलेंज आंतर शालेय क्रिकेट चषक २९ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२४ दरम्यान ही स्पर्धा झाली. जिल्ह्याभरातील १९ संघांनी यात सहभाग घेतला. आज अंतिम सामना अनुभूती निवासी स्कूलच्या क्रिकेट मैदानावर झाला. सेंट जोसेफ कॉन्व्हेन्ट इंग्लिश स्कूल जळगाव व शिंदे इंटरनॅशनल स्कूल पाचोरा यांच्यात झालेल्या सामन्यात सेंट जोसेफ कॉन्व्हेन्ट इंग्लिश स्कूल अंतिम विजेता ठरला अंतिम सामन्याची नाणेफक शिंदे इंटरनॅशनल स्कूल ने जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली. शिंदे स्कूलचा संपूर्ण संघ १२.३ षटकांमध्ये ५० धावा करू शकला. सेंट जोसेफ स्कूलने २ गडी गमावून १३.२ षटकांमध्ये ५२ धावा करीत ८ गडी राखून हा सामना जिंकला. या सामन्यात सामनाविर म्हणून वंश पाटील १९ रन व ४ विकेट त्याला सन्मानित करण्यात आले. विजयी व उपविजयी संघाला चषक देऊन गौरविण्यात आले. यासह वैयक्तिक पारीतोषिकेसुद्धा देण्यात आली. पारतोषिक वितरणाप्रसंगी जैन इरिगेशनचे मिडीया विभागाचे उपाध्यक्ष अनिल जोशी, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव अरविंद देशपांडे, हेड कोच सुयश बुरूकुल, दोघंही संघाचे प्रशिक्षक सुशांत जाधव, व सूर्यकांत देवराज उपस्थितीत होते.
उत्कृष्ट फलंदाज हर्षवर्धन पाटील ठरला त्याला क्रिकेटची बॅट व चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू तेजस पवार (शिंदे स्कूल पाचोरा) याला क्रिकेटची बॅट, पॅड, हेल्मेट किट बॅग देऊन गौरविण्यात आले उत्कृष्ट गोलंदाज म्हणून वंश पाटील ठरला त्याला बॉल, शूज व चषक देऊन गौरविण्यात आले. वैयक्तिक पारितोषिकांमध्ये वंश पाटील, तेजेस पवार, हर्षवर्धन पाटील, यश कोळी, अनुभूती स्कूलचा ध्रुव शहा, मानस पाटील, नचिकेत डांगे, ब्रीजेश पाटील यांचा सन्मान करण्यात आला. संपूर्ण मालिकेमध्ये उत्कृष्ट कॅच घेणाऱ्या अमेय पवार यालासुद्धा गौरविण्यात आला. सूत्रसंचालन फजल शेख यांनी केले.
फोटो कॅप्शन – विजयी व उपविजयी संघासोबत डावीकडून वरूण देशपांडे, सुशांत जाधव, सूर्यकांत देवराज, अरविंद देशपांडे, सुयश बुरूकूल, फजल शेख