जळगाव

अमळनेर इंदापिंप्रीच्या युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

अमळनेर तालुक्यातील शिरुड भागातील घटना

टीम आवाज मराठी अमळनेर प्रतिनिधी | ८ डिसेंबर २०२३ |  अमळनेर तालुक्यातील इंदापिंप्री येथील २६ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी निदर्शनास झाली आहे. सदर युवक कर्जबाजारी झाल्याने त्याने आत्महत्या केल्याचा असा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
चेतन जगदीश पाटील (वय २६) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो त्याच्या आईसह राहतो. या तरुणाने ६ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ८:३० वाजेच्या आसपास शिरूड शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना निदर्शनास आली आहे. पोलीस पाटील, भानूदास पाटील यांनी अमळनेर पोलीस ठाण्याला खबर दिल्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन सदर प्रकरणाचा तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button