टीम आवाज मराठी, रावेर | दिनांक 13 ऑक्टोंबर २०२३ |
मधुकर सह.साखर कारखाना आपल्या भागातील कधीही खंड न पडणारा सतत सुरळीतपणे ४५ वर्ष ऊस गाळप करणारा कारखाना म्हणून ओळख असलेला साखर कारखाना तब्बल ४ वर्षापासून बंद अवस्थेत आहे. मधुकर सह.साखर कारखाना मागील वर्षी सुरू होणार होता म्हणून परीसरातील ऊस उत्पादक शेतक-यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. परतुं थकीत रक्कमेसाठी कामगारांनी आंदोलन केल्यामुळे कारखाना कामकाज ठप्प झाले. तसेच यंदाही कारखाना सुरू होण्याच्या तयारीत असतांना कामगारांनी थकीत रक्कमेसाठी एकदिवसीय आंदोलन केले.
मधुकर सहकारी साखर कारखान्यास सन २०१८-१९ मध्ये ऊस पुरवठा केलेल्या शेतक-यांचे थकीत असलेली एफ.आर.पी.ची रक्कम मिळणेकरीता मधुकर सह. साखर कारखान्यावर नेमणुक करण्यात आलेल्या प्रशासकाकडे वेळोवेळी थकीत रक्कमेसाठी शेतक-यांनी अर्ज केलेले आहे. तसेच सन २०१८-१९ मध्ये मधुकर सहकारी साखर कारखान्यास ऊस पुरवठा केलेल्या शेतक-यांचे थकीत असलेली एफ.आर.पी.ची रक्कम व कामगारांचा भविष्यनिर्वाह निधीची रक्कम न्यायलयाकडून लवकरात लवकर शेतक-यांना मिळवून देण्याकरीता प्रयत्नशील असल्याचे आश्वासन कंपनीचे चेअरमन यांनी बोलतांना दिले. तसेच एकरी ४०००/-रूपये ऊसबेणे लागवडी साठी कारखाना प्रशासन देणार आहे. असे उद्गार पत्रकार परीषदेत श्री. देविदास धांगो पाटील.रा.दहिगांव, श्री.अनिल राजाराम बजगुजर रा.सावखेडा, श्री.डॉ. राजेंद्र चुडामन झांबरे रा.डोगरकठोरा, श्री.प्रमोद नेमचंद भिरूड श्री.दिलीप वसुदेव भिरुड, श्री .सुनील लाला भिरुड.श्री.गणेश वासुदेव भिरुड.श्री.घनःश्याम रामदास झांबरे,श्री. पद्माकर चावदस भिरुड, श्री.सुरेश मधुकर चौधरी, श्री.घनःश्याम सदाशिव झांबरे,सर्व रा कोळवद, श्री ललित देविदास महाजन, श्री . योगेश महाजन,श्री. मोतीलाल महाजन,श्री. पंकज महाजन,श्री. दिनेश नाफडे,श्री भोजराज येवले,श्री. प्रमोद महाजन, श्री अमोल पाटील,श्री. धनराज पाटील सर्व रा.कोरपावली,
ऊस उत्पादक शेतक-यांनी व्यक्त केले आहे.
कारखाना येत्या हंगामात सुरू होईल म्हणून परीसरातील सर्व ऊस उत्पादक, कारखान्यावर अवलंबून असलेले सर्व घटक यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. आपल्या परिसरामध्ये ऊस उत्पादक, तसेच साखर कारखान्यावर अवलंबून असलेले सर्व घटकांचे अर्थचक्र सुरळीत होण्यास हातभार लागणार आहे. मधुकर सहकारी साखर कारखाना संचलित मे.इंडीया बायो ॲण्ड ॲग्रो पॅसिफिक प्रा. लि. कंपनीच्या चालकांनी यावल तालुक्यातील काही ऊस लागवड करण्या-या शेतक-यांच्या भेटी घेऊन ऊस लागवड करण्यासाठी शेतक-यांशी चर्चा केली.
कारखाना सुरू झाल्यावर पुर्वी असलेल्या कामगारांना व परीसरातील अनेकांना रोजगार मिळणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या ऊसाला रास्त भाव मिळून शेतकऱ्यांचे अर्थचक्र सुरळीत होण्यास मदत होईल.कारण मागील तीन वर्षापासुन नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्या भागातील शेतक-यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. यावल तालुक्यातील ऊस एकमेव पिक असुन परिसरातील शेतकऱ्यांसाठी कारखाना संजीवनी ठरणार आहे. तरी साखर कारखाना चालकांना विनंती आहे की,तुम्ही साखर कारखाना त्वरीत सुरू करावा. ऊस उत्पादक शेतकरी ऊस लागवड करून साखर कारखाना चालन करण्याकरीता सदैव तुमच्या पाठीशी आहे. असेही मत ऊस उत्पादक शेतक-यांनी व्यक्त केले आहे.