वाघझिरा येथील २२ वर्षीय युवकाची आत्महत्या
शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू
टीम आवाज मराठी यावल प्रतिनिधी | १० ऑक्टोबर २०२३ | यावल तालुक्यातील वाघझिरा येथील एका 22 युवकाने विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्यांस तातडीने जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
अद्याप आत्महत्येचे कारण अस्पष्ट
वाघझिरा, ता. यावल येथील रहिवासी दीपक बदा पावरा (22) या युवकाने आपल्या राहत्या घरी विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला तातडीने जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतांना त्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी दिलेल्या माहिती वरून यावल पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . त्या संदर्भात तपास हवालदार उमेश महाजन करीत आहे.