टीम आवाज मराठी, जळगाव | दिनांक ३० सप्टेंबर २०२३ | – जळगाव तालुक्यातील सुभाषवाडी येथील तरुणाचा पोहायला गेला असता विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ३० सप्टेंबर रोजी निदर्शनास आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पवन भिका जाधव (वय २३, रा. सुभाषवाडी ता. जळगाव) सदर मयत तरुणाचे नाव आहे. तो सुभाषवाडी येथे परिवारासह वास्तव्यास होता. तो मिस्तरी काम करून उदरनिर्वाह करत होता. शनिवारी सकाळी तो मॉर्निंग वॉक करण्यासाठी बाहेर गेला त्यावेळी तो गावातील एका विहिरीजवळ आला. तेथे तो पोहण्यासाठी विहिरीत उतरला असता, त्यात तो पोहत असताना बुडाला. सदरील गावातील नागरिकांना घटनेची माहिती समजताच त्यांनी पट्टीच्या पोहणाऱ्यांना बोलवून. त्यांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. त्यांस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात येथे दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांस मयत घोषित करण्यात आले.
यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. पवन जाधव याच्या पश्चात आई, वडील, २ भाऊ, २ विवाहित बहीण असा परिवार होत. त्याच्या मृत्यूने सुभाषवाडी गावात शोककळा पसरली आहे.