… तर ओबीसी समाजाच्या ताटातला घास गेल्याशिवाय राहणार नाही –
महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांचा सावधानतेचा इशारा..!

उमेश महाजन, आवाज मराठी एरंडोल | २७ सप्टेंबर २०२३ | एरंडोल: लोकशाहीत डोकी मोजावी लागतात, ओबीसी समाजाने विशाल आंदोलन उभे केले नाही तर समाजाच्या ताटातला घास गेल्याशिवाय राहणार नाही असा सावधान वजा इशारा महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांनी येथे बोलतांना दिला.
एरंडोल येथे श्री स्वामी समर्थ केंद्रात सोमवारी सायंकाळी महात्मा ज्योतिराव फुले समता परिषदेची आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुण माळी हे होते.
सद्ध्या ‘बॉयलिंग स्टेज, असल्याने उकळलेल्या पाण्याचे चटके कोणाला तरी बसणार महाराष्ट्रात धनगर समाज, मुस्लिम समाज व मराठा समाज या समाजांना आरक्षण पाहिजे. आरक्षणाची टक्केवारी वाढवुन मराठा समाजाला आरक्षण दिल्यास आमचा पाठिंबा राहील, आरक्षणाचे धोरण राबविणे हा ‘गरीबी हटाव, चा कार्यक्रम नाही असा टोला कर्डक यांनी लगावला.
या आढावा बैठक प्रसंगी उ.बा.ठा शिवसेने चे जिल्हा प्रमुख हर्षल माने, अरुण माळी, डॉ. नलिन महाजन माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन,अनिल नळे, वसंत पाटील, विजय महाजन, शालिग्राम मालकर, अशोक चौधरी, विजय महाजन, रवींद्र महाजन, राजेन्द्र महाजन, गोपाल पाटील, रामभाऊ गांगुर्डे, सुरेश देशमुख, नितीन महाजन, गोरख चौधरी, पी. जी. चौधरी, भीमराव महाजन, गजानन महाजन, अमोल माळी, प्रमोद महाजन, गोपाल महाजन, आरिफ मिस्तरी, प्रा. सुधीर महाजन, सुदर्शन बागुल, संजय महाजन, अनिल महाजन, भिका चौधरी, सागर महाजन आदी ओबीसी समाजबांधव उपस्थित होते.
समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष वसंत पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप बोढरे यांनी केले तर आभार प्रदर्शन गजानन महाजन यांनी केले. बैठकीच्या प्रारंभी दिवंगत ज्येष्ठ विचारवंत प्रा.हरी नरके यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.