जळगाव

हनुमंत खेडे येथे पाय घसरून अंजनी नदीच्या पाण्यात पडल्याने एकाचा मृत्यू…

अंजनी नदी पार करत असताना पाय घसरल्याने घडलेला प्रकार

उमेश महाजन, आवाज मराठी एरंडोल | २५ सप्टेंबर २०२३ | एरंडोल -तालुक्यातील हनुमंत खेडे बुद्रुक हे अंजनी नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर तर सोनबर्डी हे पूर्व किनाऱ्यावर वसलेले आहे या दोन्ही गावांना जोडणारा एक साधा फुल उभारण्यात आला आहे विशेष हे की अंजनी धरणाच्या जलाशयातील पाण्याचा फुगवटा गावापर्यंत व गावाच्या पुढे देखील आहे. अंजनी नदी पात्रात पाईप टाकून वर खडी, दगड रेती टाकण्यात आली आहे. सदर रेती पाण्यात वाहून गेली होती. या पुलावरून हनुमंत खेडे बुद्रुक येथील राजेंद्र भगवान पाटील वय ६२ वर्ष हा इसम अंजनी नदी पार करत असताना पाय घसरल्याने तो पाण्यात वाहून गेला ‌. ही घटना रविवारी सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास घडली. या घटनेचे वृत्त समजताच कर्तव्य तत्पर महिला तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी समक्ष जाऊन भेट घेतली व घटनेची माहिती घेतली सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास सदर व्यक्तीचा मृतदेह गावालगत नदीच्या किनाऱ्या ला आढळून आला.
राजेंद्र पाटील हा रविवारी सोनबर्डी शिवारातील गोदामाच्या बांधकामावर मजूर म्हणून कामाला गेला होता संध्याकाळी तो जुन्या पुलावरून घरी परततानां त्याचा पाय घसरल्याने तो नदीच्या पाण्यात पडला व पाण्यात वाहून गेला रात्री उशिरापर्यंत त्याला शोधण्यासाठी मोहीम राबविण्यात आली पात्र यश मिळाले नाही सोमवारी सकाळी अंजनी नदीच्या किनाऱ्याला त्याचा मृतदेह आढळून आला सोमवारी दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button