बांभोरीच्या अभियांत्रिकी कॉलेजातून चोरट्यांनी मोबाईल लांबविले
धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील घटना
टीम आवाज मराठी, जळगाव | ४ सप्टेंबर २०२३| येथील जळगाव पासून जवळच असलेल्या धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील श्रम साधना ट्रस्ट संस्थेच्या अभियांत्रिकी कॉलेजमध्ये परीक्षेचा पेपर देण्यासाठी आलेल्या तीन विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरी झाल्याचा प्रकार शुक्रवारी १ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते १२ वाजेच्या आसपास घडला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला शनिवारी २ सप्टेंबर रोजी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील सावखेडा येथील प्रज्वल चंपालाल पाटील (वय-१९) हा तरूण शुक्रवारी १ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील श्रम साधना ट्रस्ट संस्थेच्या अभियांत्रिकी कॉलेजमध्ये परिक्षा होती तो आपल्या मित्रांसह ते पेपर कॉलेजमध्ये दाखल झाले. सकाळी १० वाजता पेपर असल्याने परिक्षेच्या अगोदर प्रज्वल पाटील यांनी त्यांच्या सोबत आणलेल्या बॅगमध्ये त्याचे व मित्रांचे एकुण ३ मोबाईल बँगेत ठेवून परिक्षा हॉलमध्ये गेले. दरम्यान दुपारी १२ वाजता पेपर सुटल्यानंतर बॅग तपासली असता अज्ञात चोरट्यांनी तीन मोबाईल चोरल्याचे निदर्शनास आले.
सदरहू घटना घडल्यानंतर या तरुणांनी इतरत्र सगळीकडे शोध घेतला असता परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर शनिवारी २ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता धरणगाव पोलिस स्टेशनला धाव घेवून तक्रार तक्रार देण्यात आली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात धरणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल गजानन महाजन करीत आहे.