टीम आवाज मराठी, जळगाव | २२ ऑगस्ट २०२३
अनुभूती स्कूल येथे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जळगाव तालुकास्तरीय आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धेत मुलांमध्ये अनुभूती स्कूलने १७ व १९ वर्षाआतील वयोगटा मध्ये प्रथम स्थान आणि १४ वर्षातील वयोगटात तृतीय स्थान प्राप्त केले, तसेच मुलींमध्ये १४ वर्षाआतील वयोगटात प्रथम स्थान आणि १७ व १९ वर्षाआतील वयोगटात द्वितीय स्थान प्राप्त केले.
विजयी व उपवीजयी संघांना अनुभूती स्कूलचे प्राचार्य देबाशिस दास व व्यवस्थापक विक्रांत जाधव तसेच क्रीडा शिक्षक दीपक बीस्ट यांचे हस्ते जैन स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे प्रायोजित स्वर्ण व रजत पदक देण्यात आले.
प्रायोजक तर्फे पदक तर शासनातर्फे प्रमाणपत्र
या स्पर्धेतील विजयी उपविजय संघातील खेळाडूंना वैयक्तिक सुवर्ण व रजत पदक जैन स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे देण्यात आली.
स्पर्धा यशस्वीतेसाठी जळगाव तालुका प्रतिनिधी प्रशांत कोल्हे यांच्या नेतृत्वात किशोर सिंह सिसोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली विकास बारी, शुभम पाटील, दिपीका ठाकुर प्रनेश गांधी, करण पाटील, पुनम ठाकुर, भावेन खाबिया, सुयश आंधळे, पियुष सोनी, अक्षत पगारिया, मेहेर लाडके, मयंक मुथा, चिन्मय पाटीदार यांनी पंच म्हणून कामगिरी पार पडली तसेच स्पर्धेचे सूत्रसंचालन अनुभूती स्कूलच्या बॅडमिंटन प्रशिक्षिका दीपिका ठाकूर आणि आभार तालुका प्रतिनिधी प्रशांत कोल्हे यांनी केले.