टीम आवाज मराठी महेश शिरोरे देवळा | ७ ऑगस्ट २०२३| : नाशिक जिल्ह्यातील महावितरण अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री लोकेश चंद्रा यांच्या संकल्पनेतून व नाशिक परिमंडळ मुख्य अभियंता मा. श्री दिपक कुमठेकर, यांच्या निर्देशानुसार मालेगाव अधीक्षक अभियंता श्री जगदीश इंगळे व कार्यकारी अभियंता कळवण श्री युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरण देवळा उपविभाग २ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट ग्राहक सेवा सप्ताह राबविण्यात येत आहे.
सदर ग्राहक सेवा सप्ताह अंतर्गत तात्काळ (अकृषक) नवीन वीज जोडणी, प्रलंबित वीज जोडणी, कायमस्वरूपी, तात्पुरता खंडित केलेला विद्युत पुरवठा पूर्ववत करणे, विद्युत देयकाचे नाव, पत्ता विद्युत भार वर्गवारी बदल करणे, वीज बिल दुरुस्ती करणे इत्यादी बाबी करण्यात येणार आहेत.
तरी सदर सेवा सप्ताहाचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महावितरण देवळा उपविभाग उपकार्यकारी अभियंता श्री बंकट सुरवसे यांनी केले आहे. सदर सप्ताहाचे औचित्य साधून माळवाडी ता. देवळा येथील सरपंच श्री शिवाजी वामन बागुल, साहेबराव बागुल, अशोक बच्छाव ,बापू बच्छाव व गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ यांची उपकार्यकारी अभियंता श्री बंकट सुरवसे, घनश्याम कुंभार सहाय्यक अभियंता ठेंगोडा, विनोद शेवाळे वरिष्ठ तंत्रज्ञ यांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थांच्या सहकार्याने गाव “आकडे व वीज समस्या मुक्त गाव” करण्याचे नियोजन करण्यात आले असून सदर गावातील प्रत्येक घराला/ शेती पंपाला विद्युत कनेक्शन अतिभारीत रोहित्र वर नवीन रोहित्र संभाव्य अपघात टाळण्यासाठी विद्युत संच मांडतीत सुधारणा, विद्युत दुरुस्ती, ग्राहक सेवा या बाबतीत योग्य तत्परता दाखवून गाव आकडे व वीज समस्या मुक्त करण्यसाठी महावितरण देवळा प्रयत्नशील आहे. सदर सप्ताहा दरम्यान आजतागायत नावात बदल ३१, विजदुरुस्ती २७ व नवीन वीज जोडणी ५५ अशा एकूण ११३ वीज समस्यांचे निराकरण करण्यात आले आहे.