टीम आवाज मराठी नवी दिल्ली | ७ ऑगस्ट २०२३ | : केवळ मोदी आडनाव बदनामी प्रकरणात २३ मार्च रोजी राहुल गांधी यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यानंतर २४ तासांतच २४ मार्च रोजी त्यांची खासदारकी सुद्धा गेली होती. यानंतर गुजरात उच्च न्यायालयानेही शिक्षा पुढे कायम ठेवली. याविरोधात राहुल यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. तब्बल १३४ दिवसांनंतर ४ ऑगस्टला न्यायालयाने राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिली त्यानंतर तब्बल १३७ दिवसानंतर म्हणजे ७ ऑगस्ट रोजी राहुल गांधी संसद भवनात आज पोहोचले आहेत.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज सकाळीच राहुल यांना सभासदत्व बहाल केल्यानंतर संसदे मध्ये प्रवेश होताच राहुल गांधी यांनी अगोदर महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून यानंतर ते भवनात गेले. लोकसभेत राहुल आपल्या खुर्चीवर बसले, त्यानंतर ५ मिनिटांनी सभागृहाचे कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.