टीम आवाज मराठी, धरणगाव | १३ जुलै २०२३ | भारतीय जनता पार्टीचे नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतांना वापरलेल्या शब्दावरून धरणगावातील तृतीयपंथी आक्रमक झाले आहे. धरणगाव शहरात त्यांनी टीका करणा-या चारही मंत्र्यांच्या बॅनर वरील फोटोंना जोडे मारून आपला निषेध व्यक्त केलाय.
यावेळी आंदोलनात उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पदाधिका-यांनी देखील सहभाग घेतला. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, युवा सेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी, तालुका प्रमुख जयदीप पाटील, जानकीराम पाटील, नंदलाल पाटील,लिलाधर पाटील, भागवत चौधरी यांच्यासह धरणगाव शहरातील तृतीयपंथींनी घोषणा देत जोडेमार आंदोलन केले.