४२ व्या राष्ट्रीय ज्युनिअर तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमी च्या निकिता दिलीप पवार हिला सुवर्णपदक

जळगाव, दि.2 (प्रतिनिधी) – :- दिनांक ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ रोजी राजीव गांधी इनडोअर स्टेडियम, बॅगंलोर येथे सुरू असलेल्या ४२ व्या राष्ट्रीय ज्युनिअर क्युरोगी आणि १५ वी पुमसे स्पर्धेत जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमी ची खेळाडू कु. निकिता दिलीप पवार हिने ५५ किलो आतिल वजन गटात सुवर्णपदक पटकावले आहे तिने पहिल्या फेरीत कर्नाटकच्या मोनिषा एस., दुसऱ्या फेरीत केरळची अवंतिका व्हि. तिसऱ्या फेरीत मध्य प्रदेश ची अस्मी भारती हिचा पराभव करून अंतिम फेरीत मध्ये आसाम ची खेळाडू व्हिएना हजारिका हिला नमवत सुवर्णपदकावर आपले नांव कोरले.
निकिता पवार हि जैन स्पोर्टस् अकॅडमी तथा जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन ची खेळाडू असुन गेले ४ वर्षांपासून नियमित सराव करत असुन तिला प्रशिक्षक जयेश बाविस्कर तसेच मुख्य प्रशिक्षक अजित घारगे याचं प्रमुख मार्गदर्शन लाभले आहे, शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी सुद्धा तिची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली असून जम्मू काश्मीर येथे होणार असलेल्या ६९ व्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.

तिच्या या यशाबद्दल जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष श्री अतुल भाऊ जैन, उपाध्यक्ष श्री ललित पाटील, खजिनदार श्री सुरेश खैरनार, सचिव श्री अजित घारगे, सहसचिव श्री रविंद्र धर्माधिकारी, सदस्य श्री नरेंद्र महाजन, श्री कृष्णकुमार तायडे, श्री महेश घारगे, श्री सौरभ चौबे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमी चे अरविंद देशपांडे यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.




