वणी घाटात बस कोसळली
जळगाव जिल्ह्यातील १५ प्रवाशांचा समावेश, अमळनेर मुडी मांडळ येथील महिलेचा मृत्यू
टीम आवाज मराठी, जळगाव। १२ जुलै २०२३ । नाशिकच्या वणी येथील सप्तश्रृंगी गडाकडे जाणा-या घाटात प्रवाशांसह बस दरीमध्ये कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २१ प्रवासी जखमी झाले असून एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या बसमध्ये जळगाव जिल्ह्यातील १५ प्रवाशांचा समावेश असून त्यात एका महिला प्रवासीचा मृत्यू झाला आहे. आशाबाई राजेंद्र पाटील ( वय ५० ते ५५) रा. मुडी मांडळ, ता. अमळनेर) असे या अपघातातील मृत महिलेचं नाव आहे.
नेमकी घटना कशी आहे?
सदर अपघातग्रस्त बस हि खामगाव आगाराची असून काल सकाळी ८:३० वाजता ही बस नाशिक जिल्ह्यातील वणी जवळील सप्तशृंगी गडाच्या दिशेनं रवाना झाली होती. त्यानंतर बस सप्तशृंगी गडावर रात्री मुक्कामाला थांबली होती. त्यानंतर परत सप्तशृंगी गड ते खामगाव (बुलढाणा) असा बसचा प्रवास सुरू झाला होता. या दरम्यान, वणीयेथील सप्तशृंगी गडावरून खाली येत असलेल्या बसला अपघात झाला असून बस सरळ ४०० फूट दरीत कोसळली. सदर बसमध्ये जवळपास ३० ते ३५ प्रवासी असल्याचे कळते.
त्यात एकूण २१ प्रवासी जखमी झाले असून त्यात १५ प्रवाशी हे जळगाव जिल्ह्यातील होते. यात एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. मृत महिला आशाबाई राजेंद्र पाटील या अमळनेर तालुक्यातील मुडी मांडळ येथील रहिवाशी आहे.
अपघातातील जळगाव जिल्ह्यातील जखमी
प्रमिला गुलाबराव बडगुजर, सुनील गुलाबराव बडगुजर, – रा. मुडी ता. अमळनेर, जि जळगाव
रघुनाथ बळीराम पाटील – रा. भोकर, जि जळगाव
बाळू भावलाल पाटील – रा. भोकर, जि जळगाव
संजय बळीराम भाईर – रा. मुडी ता. अमळनेर, जि जळगाव
सुशीलबाई सोनू बडगुजर – रा. मुडी ता. अमळनेर, जि जळगाव
वच्छलाबाई साहेबराव पाटील – रा. मुडी ता. अमळनेर, जि जळगाव
सुशीलबाई बबन नजान – रा. मुडी ता. अमळनेर, जि जळगाव
विमलबाई भोई – रा. मुडी ता. अमळनेर, जि जळगाव
प्रतिभा संजय भोई – रा. मुडी ता. अमळनेर, जि जळगाव
जिजाबाई साहेबराव पाटील – रा. मुडी ता. अमळनेर, जि जळगाव
संगीता मंगुलाल भोई – रा. मुडी ता. अमळनेर, जि जळगाव
रत्नाबाई (नाव सांगता आले नाही) – रा. मुडी ता. अमळनेर, जि जळगाव
सुरेखाबाई हिरालाल बडगुजर – रा. मुडी ता. अमळनेर, जि जळगाव
संगीत बाबुलाल भोई – रा. मुडी ता. अमळनेर, जि जळगाव
भारगोबाई माधवराव पाटील – रा. मुडी ता. अमळनेर, जि जळगाव