जळगाव

उमवीत भजन प्रभातने महात्मा गांधींना आदरांजली

टीम आवाज मराठी, जळगाव (प्रतिनिधी) दि. 2 ऑक्टोबर 2024 :   कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात महात्मा गांधी जयंती निमित्त गांधी टेकडीवर झालेल्या “भजन प्रभात” या कार्यक्रमात सादर झालेल्या भजनांनी महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यात आली. याच कार्यक्रमात भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना देखील वंदन करण्यात आले.

     विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळेअंतर्गत महात्मा गांधी अध्ययन व संशोधन केंद्राच्यावतीने सोमवार दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी गांधी टेकडीवर संगीत विभागाच्यावतीने भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. रघुपती राघव राजाराम, पायोजी मैने राम रतन धन पायो, वैष्णव जन तो तेने कहीये, गुरु गोविंद दोऊ खडे, इतनी शक्ति हमे दे न दाता, खरा तो एकचि धर्म, हमको मन की शक्ति, तूम बीन मोर, चादरीया झीनी झीनी या भजनांनी महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यात आली. महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. या नंतर विद्यापीठाच्या समाज कार्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी “स्वच्छता” या विषयावर पथनाट्य सादर केले.

यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचा सेल्फी पॉईंट उभारण्यात आला तेथे कुलगुरुं समवेत विद्यार्थ्यांनी सेल्फी घेतल्या. या कार्यक्रमास कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, प्र-कुलगुरु प्रा.एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा.योगेश पाटील, विचारधारा प्रशाळेचे प्रभारी संचालक प्रा.म.सु. पगारे, महात्मा गांधी अध्ययन व संशोधन केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. उमेश गोगडीया, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, प्रा. सचिन नांद्रे, प्रा. के.पी. दांडगे, प्रा.मनसरेआदी उपस्थित होते. संगीत विभागाचे प्रा. पूजा कोळी, प्रा.तेजस मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली माधुरी महाजन, प्राची सुर्यंवशी, मनोज गुरुव, विजयराज जाधव, सुरेश पाटील, चेतन शिंदे, सुकन्या जाधव, यांनी भजन सादर केले. महेश शेंडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.उमेश गोगडीया यांनी मानले.

सुरुवातीस कुलगुरु प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरु प्रा.एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा.योगेश पाटील, विचारधारा प्रशाळेचे प्रभारी संचालक प्रा.म.सु. पगारे, महात्मा गांधी अध्ययन व संशोधन केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. उमेश गोगडीया, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक प्रा. सचिन नांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली रासेयोच्या विद्यार्थ्यांनी “स्वच्छता ही सेवा” या पंधरवडया निमित्त रासेयोच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परीसरातील गांधी टेकडी, विविध प्रशाळा, मुला-मुलींचे वसतिगृहे, आदी ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविली. तसेच रासेयोचे संचालक डॉ.सचिन नांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी गेल्या पंधरा दिवसात जळगाव शहरातील बस स्टँड, न्यायालय परीसर, रेल्वे स्टेशन व इतर काही भागात स्वच्छता करुन प्लॅस्टीक गोळा करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button