जळगाव

शेतीकडे व्यवसायीक दृष्टीने बघा

जैन हिल्स ला आजपासून फालीचे दहावे अधिवेशन सुरु; शेतकऱ्यांशी फालीच्या विद्यार्थ्यांचा संवाद

टीम आवाज मराठी जळगाव दिनांक 22-4-2024- शेती करायची असेल तर प्रत्येकामध्ये सर्वगुण संपन्न असावे, ईलेक्ट्रीशयन पासून सर्व काही करावे लागते. भविष्यात मजूरांची टंचाई निर्माण होईल मात्र त्यावर शाश्वत सोल्यूशन काढले पाहिजे. गुणवत्ता, ॲग्रोनाॕमिक सेवेत जैन इरिगेशनमध्ये शेतकऱ्यांचा विचार केला जातो ते कुटुंबाप्रमाणेच समजतात, असे मनोगत फाली सुसंवादामध्ये सहभागी शेतकऱ्यानी व्यक्त केले.

भारतीय शेती व कृषी-उद्योगाचे भविष्य बदलणाऱ्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) अधिवेशनची आज जैन हिल्सला सुरवात झाली. शेतकऱ्यांच्या सुसंवादात, शेतीत प्रत्येक दिवशी समस्या आहे, मात्र सोल्यूशन शोधावे लागेल, एकच चावी आहे ती म्हणजे जैन इरिगेशन! बाजारातील मागणीप्रमाणे गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतले पाहिजे. शेती करावीच लागेल नाहीतर खाणार काय? शेती हा असा व्यवसाय असून ती करावीच लागेल त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची साथ घेतली पाहिजे यातुन भविष्यातील नायक घडविले जातील. शेती पोट भरण्यापूरती न करता उत्पादन वाढविणे हे महत्त्वाचे आहे. असा केळी, हळद, मका, कांदा, आले, आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी सुसंवाद साधला. हवामानातील बदल, मार्केंटिग, नविन तंत्रज्ञान, केळी उत्पादनाचे नफ्याचे आर्थिक गणिते, जैन तंत्रज्ञान यासह विविध प्रश्न विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना विचारले. सुनील नारायण पाटील-देवरे (भारूडखेडा ता जामनेर), प्रताप काशिनाथ भुतेकर (तोंडापूर, ता जामनेर), अंकूश राजेंद्र चौधरी (चांगदेव, ता. मुक्ताईनगर), प्रफुल्ल महाजन (वाघोदा ता. रावेर), निखील मनोहर ढाके (न्हावी ता. यावल) या शेतकऱ्यांनी आपले अनुभव सांगत भविष्यातील शेतीविषयी मार्गदर्शन केले. रागिणी सहारे, सुजीत नलवंडे, पार्थ बाभूळकर, सानिका बोडके, निलेश चौधरी, प्रियंका शाहू या फाली विद्यार्थ्यांनी लिड केले. जुली पटेल, रोहिणी घाडगे यांनी सूत्रसंचालन केले.

पहिल्या टप्प्यातील पहिला दिवस

फाली उपक्रमात पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, व मध्यप्रदेश राज्यातील ४०० विद्यार्थी व ५० फालीचे शिक्षक सहभागी झाले. पहिल्या दिवशी जैन हिल्स येथील परिश्रम, ड्रीप डेमो, अल्ट्रा हायडेन्सिटी प्लान्ट डेमो प्लॉट, फ्यूचर फार्मिंग, एअर आलू, टिश्यू कल्चर येथे भेट दिली. जगप्रसिद्ध अशा गांधी तीर्थच्या म्युझियमला देखील भेट दिली. त्याचप्रमाणे टिश्युकल्चर पार्क, फळ प्रक्रिया प्रकल्पास भेट देऊन तेथील निर्मितीची प्रक्रिया जाणून घेतली. याच्या यशस्वीतेसाठी जैन इरिगेशनचे अधिकारी, सहकारी तसेच फालीचे हर्ष नौटियाल यांनी परिश्रम घेतले.

अधिकारी व शेतकरी यांच्यासमवेत विद्यार्थ्यांची गट चर्चा

दुपार सत्राच्या या कार्यक्रमात परिश्रम जैन हिल्स येथे गट चर्चा झाली यामध्ये जैन इरिगेशनचे तज्ज्ञ डॉ. के बी पाटील, डॉ. अनिल ढाके, अतिन त्यागी, संजय सोनजे, जगदीश पाटील हे तसेच इमरान कांचवाला, निवेश जैन (स्ट्रार ॲग्री), दीपक ललवाणी ( महिंद्रा सेंट्रल ऑफ एक्सलन्स), शैलेंद्र सिंग, सहयोग तिवारी (आय टी सी), डॉ.परेश पाटील (अमूल इंडिया), डॉ.विनोद चौधरी (गोदरेज टायसन) त्याच प्रमाणे रावेर तालुक्यातील केऱ्हाळा येथील प्रगतशील शेतकरी अमोल पाटील सहभागी झाले होते.

१० वा वर्धापन दिन

फाली कार्यक्रमाचा आज १० वा वर्धापन दिन होता या निमित्ताने फालीच्या संस्थापिका नॅन्सी बॅरी यांच्यासह शिक्षक, अधिकारी आणि शेतकरी यांच्या उपस्थितित केक कापण्यात आला. आजचे पाहुणे म्हणून लाभलेले प्रगतशील शेतकरी अमोल पाटील यांचा ही वाढदिवस होता. त्यांच्या जन्म दिनाच्या औचित्याने पाटील यांच्या हस्ते केक कापण्यात आला.

आज इनोव्हेशन आणि व्यवसाय योजनांचे सादरीकरण

फाली १० मध्ये सहभागी होणाऱ्या शाळांमधील फालीचे विद्यार्थी शालेय स्तरावरील व्यवसाय योजना आणि अॅग्रीटेक इनोव्हेशन स्पर्धांचे विजेते आहेत. हे विद्यार्थी जैन हिल्सच्या आकाश ग्राऊंड कृषी क्षेत्रातील संशोधनाविषयी सादरीकरण करणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button