आत्ता जर भाजप ला मदान केलं तर स्वतः च्या पायावर कुर्हाड मरून घेणे-: आ.प्रणिती शिंदे
भाजप नेत्यांनी राजकीय सुडापोटी सिध्देश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडली, दहा महिने होऊनही विमानसेवा सुरू केले नाही : आ. प्रणितीताई शिंदे
टीम आवाज मराठी जळगाव –:महाराष्ट्र प्रदेश काँगेस कमिटीचे कार्याध्यक्षा, आ. प्रणितीताई शिंदे ह्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणुन घेण्यासाठी गावभेट दौरा सुरू असून आज हत्तुर, बडकबाळ, वांगी, गावडेवाडी, कंदलगाव, अकोले, गुंजेगाव, अंत्रोळी, वडापुर, कूसुर, खानापूर, तेलगाव, भंडारकवठे, बाळगी, सादेपूर, माळकवठा या गावात भेट देऊन गावकऱ्यांच्या समस्या जाणुन घेतल्या.
यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधताना आमदार प्रणितीताई शिंदे म्हणाले की, निवडणूकीअगोदर भाजपने पंधरा लाख देतो, काळा पैसा आणतो, युवकांना दरवर्षी दोन कोटी रोजगार, महागाई कमी करतो यासारख्या अनेक खोटे आश्वासने दिली पण भाजप सरकारच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, पाण्याचे नियोजन नाही, इंधन दरवाढ, शेतीमालाला दर नाही, पीक विमा मिळत नाही यामुळे जनता मेटाकुटीस आली असून यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्याच प्रमाणे केवळ राजकीय सुडातून भाजप नेत्यांनी सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडली प्रचंड नुकसान केले. पण विमानसेवा काही सुरू केले नाही. भाजपला पुन्हा साथ दिली तर आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखे होईल.
गेल्या दहा वर्षात सोलापूरच्या निष्क्रिय आमदार, खासदारांनी सत्ता असूनही सोलापूरचा एकही प्रश्न मांडले नाही. विरोधी पक्षाचे एकमेव आमदार म्हणून मी सोलापूर जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडते. रक्ताच्या नात्यापेक्षा विश्वासाचे नाते फार महत्वाचे असतात माझ्यावर विश्वास ठेवा तो विश्वास सार्थ करून दाखवेन आणि ते माझ्या शहर मध्य मतदारसंघात करून दाखविले. आपले काम करणाऱ्या विसरू नका. दक्षिण सोलापूरच्या विकासासाठी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला साथ द्या असे आवाहन केले.
या गावभेट दौऱ्यात c यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.