आदिवासी आश्रमशाळा क्षमता चाचणीकडे शिक्षकांनी फिरवली पाठ
आत्माराम पाटील | आवाज मराठी, चोपडा | दिनांक १७ सप्टेंबर २०२३
चोपडा कॉलेज येथे आदिवासी विकास विभागाकडून अनुदानित व शासकीय आश्रम शाळेतील प्राथमिक मुख्याध्यापक माध्य. मुख्याध्यापक, प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक यांची शिक्षक क्षमता चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. यावल प्रकल्प अंतर्गत एकूण 681 शिक्षकांची परीक्षा आज रोजी आयोजित करण्यात आली होती.त्यापैकी 680 लोकांनी बहिष्कार टाकत परीक्षेला गैरहजेरी नोंदविली. आजच्या बहिष्कार हा शंभर टक्के यशस्वी झालेला आहे,यातुन अन्यायविरुध्द शासनाला कर्मचारी एकीचं बळ दाखवून दिले,
चोपडा येथे स्वाभिमानी शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष माननीय भरजी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उपाध्यक्ष विजयजी कचवे ,राज्य सहकार्यवाह भूपेंद्र पाटील ,जिल्हा कार्याध्यक्ष भालचंद्र पवार ,तालुका अध्यक्ष विकास पाटील ,श्री हिवराळे सत्रासेन संस्थेचे उपाध्यक्ष धनंजय भादले तसेच मुख्याध्यापक संदीप पाटील जगदीश महाजन, भगवान भालेराव,दिपक पाटील ,शिरसाट सर, वाघ , मधुकर भोई, निलेश धनगर , लांबोळे सर श्री गोपाल पाटील विकास पाटील, सुनील कन्हैये, योगेश पाटील, उदय वानखेडे, विकास कोळी,नरेंद्र देसले , गजानन पाटील विकास रामदास पाटील , विशाल भोई, हितेंद्र पाटील,जाधव तसेच संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.