
टीम आवाज मराठी, मुंबई | दिनांक 8 सप्टेंबर 2023
मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटर,भवरलाल आणी कांताबाई जैन फाउंडेशन व परिवर्तन जळगाव या तीन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने कविवर्य ना.धो. महानोर यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या कविता व गीतांनी त्यांना स्वरांजली अर्पण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे नाव “हा कंठ दाटूनी आला” असून हा कार्यक्रम शनिवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर नरिमन पॉईंट येथे हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाची निर्मिती परिवर्तन ,जळगाव यांची आहे, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. शरदचंद्रजी पवार असतील तर भालचंद्र नेमाडे , रामदास भटकळ ,जब्बार पटेल ,सुप्रिया सुळे ,अशोक जैन ,सयाजी शिंदे, सोनाली कुलकर्णी ,अजित भुरे, जितेंद्र जोशी व हर्षल पाटील हे सर्व महानोरांच्या कवितांचं वाचन करणार आहेत .
तसेच परिवर्तनचे कलावंत श्रद्धा कुलकर्णी ,भूषण गुरव, अक्षय गजभिये ,ऐश्वर्या परदेशी, संजय सोनवणे हे गीते सादर करणार आहेत . शंभू पाटील हे या कार्यक्रमाचे निवेदक असतील. या कार्यक्रमाची संकल्पना नारायण बाविस्कर यांची आहे . हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला आहे तरी रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे अस आवाहन खा. सुप्रिया सुळे व जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले आहे.