उमेश महाजन, एरंडोल | ०४ सप्टेंबर २०२३ | मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालन्यातील अंतरवाली सराठी या ठिकाणी शांतपणे आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठी चार्ज च्या निषेधार्थ रस्ता रोको आंदोलन करून तहसीलदार सुचिता चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यास मागणीसाठी शांतपणे आंदोलन करणाऱ्या बंधू व भगिनींवर पोलिसांनी निंदनीय व अमानुषपणे केलेल्या लाठीचार्जे च्या निषेधार्थ धरणगाव चौफुलीवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व सकल मराठा समाज च्या वतीने सरकारचा निषेध करण्यात आला व शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली .रस्ता रोको आंदोलन दरम्यान काही तास वाहतूक होती .त्यानंतर मोर्चा काढून तहसीलदार सुचिता चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी उबा ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने, माजी जी प सदस्य नानाभाऊ महाजन, माजी जि प उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले,शिवसेना नेते रमेश महाजन,माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी विजय महाजन, प्रा. शिवाजीराव अहिरराव, तालुका प्रमुख रवींद्र चौधरी, पारोळ्याचे आर.बी.पाटील, अशोक मराठे, के.डी पाटील, माजी नगरसेवक डॉ. सुरेश पाटील माजी नगरसेवक अभिजीत पाटील, युवा सेना तालुकाप्रमुख कुणाल महाजन, शहर प्रमुख अतुल महाजन, प्रमोद महाजन, जळूचे सरपंच गुलाब चंद्रसिंग पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र चौधरी, राजेंद्र शिंदे, प्रा आर एस पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे रवींद्र पाटील, डॉ. सुनील चौधरी, प्रशांत पाटील, कलीम शेख, उमेश देसले, गजानन पाटील, संभाजी पाटील, राजेंद्र शिरसाट, भूषण देसले, अशोक भवर, स्वप्निल सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरीक्षक सतीश गोराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे, पोलीस उपनिरीक्षक देशमुख पोलीस कॉन्स्टेबल अनिल पाटील मिलिंद कुमावत पंकज पाटील सुनील लोहार आदींनी चौक बंदोबस्त ठेवला.