एरंडोल तालुका दुष्काळ जाहीर करावा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मोर्चा
माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा
उमेश महाजन | आवाज मराठी एरंडोल | दिनांक ४ सप्टेंबर २०२३ – येथील एरंडोल राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे एरंडोल तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करणे व विविध मागण्यांसाठी माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
निवेदनात गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे उभे पिक करपले आहे पिकांची स्थिती दयनीय झालेली आहे . मोठ्या उमेदीने त्यांनी खरिपाची लागवड केली होती. काहींनी कर्ज काढून व वाटेल ती मजुरी मोजून पिके वाढवण्याचा प्रयत्न केला परंतु दुर्दैवाने घात झाला शेतकऱ्यांची उभी पिके जळत असताना शासनाच्या वतीने कोणतीही मदत जाहीर झाली नाही उलट तालुक्यातील पाचही महसूल मंडळामध्ये शेतकरी पिक विमा पात्र असताना शासनाकडून मदत मिळाली नाही अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक परिस्थितीचा आढावा घेतला पाहिजे तसेच शासनाने त्वरित सर्वच महसूल मंडळांना पिक विमा साठी पात्र करून २५% टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश विमा कंपन्यांना दिले पाहिजे व संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना राज्य आपत्ती निवारण निधीमधून आर्थिक मदत करावी सर्व दूर पाण्याचे कमी असल्याने गुरांचा चाऱ्याचा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे . त्यासाठी गावागावात चारा छावणी उभ्या करून पशुधन वाचवावे शेतकऱ्यांच्या विहिरींना थोडेफार पाणी आहे त्या पाण्यातून शेतकरी आपली पिके वाचवण्याची धडपड करीत असताना त्यांना विजेचे लोड शेडिंग बंद करून शेतकऱ्यांना दिवसा ८ तास वीज मिळावी व ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केलेली आहे. त्यांना प्रोत्साहन पर ५० हजार रुपये अनुदान मिळावेअशा मागण्या करण्यात आल्या असून शेवटी सदर मागण्या तात्काळ मंजूर करण्यात याव्या अन्यथा १५ सप्टेंबर नंतर तालुक्यात ठीक ठिकाणी रस्ता रोको आंदोलने निदर्शने करण्यात येतील आणि निर्माण होणाऱ्या परिस्थितीला शासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे.
याप्रसंगी जि प सदस्य रोहन पाटील , विधानसभा क्षेत्र प्रमुख पराग पवार , तालुकाध्यक्ष राजेंद्र देसले, संतोष महाजन, कपिल पवार , राजेंद्र शिंदे , विकास पाटील , ईश्वर पाटील , कमलाकर पाटील, संदीप वाघ , महिंद्र पाटील , शांताराम पाटील , धोंडू मराठे , विनोद पाटील , भागवत पाटील , दीपक पाटील , नंदू खैरनार , ज्ञानेश्वर महाजन , विजय पाटील , सागर बियानी , हिरा पाटील , ॲड.अहमद सय्यद , कपिल पवार , किशोर पाटील राजेंद्र बडगुजर , उखर्डू पाटील , सतीश देशमुख , परमेश्वर राठोड , जितेंद्र महाजन , एन डी पाटील , बापूराव पाटील , डॉ . वाय. डी. पाटील , लीलाधर पाटील , ज्ञानेश्वर पाटील , रितेश पवार , भिकन खाटीक , किशोर बडगुजर , जगदीश पाटील , मोनू राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.