जळगाव

माध्यमिक, प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या बाबत निवेदन

पदवीधर आमदार मा. श्री सत्यजित तांबे यांना सादर

आत्माराम पाटील | आवाज मराठी, चोपडा | २४ ऑगस्ट २०२३ | नाशिक विभाग पदवीधर आमदार मा. श्री सत्यजित तांबे साहेब यांची काल प्राथमिक व माध्यमिक संघटनेच्या पदाधिकारींनी भेट घेऊन त्यांना माध्यमिक,प्राथमिक शिक्षक बांधवांच्या प्रलंबित समस्या बाबत निवेदन दिले त्यात वैद्यकीय देयक प्रतिपूर्ति, सेवानिवृत्त शिक्षक बांधवांचे प्रलंबित प्रकरणे देय रक्कमांना लागणारा वेळ व वरिष्ठ तसेच निवड श्रेणीची प्रलंबित प्रकरणे याबाबत लेखी स्वरूपात मा.साहेबांना निवेदन दिले मा.सत्यजित तांबे साहेबांनी सदर सर्व समस्या सर्व पातळीवर लवकरात लवकर मार्गी लावु याबाबत हमी दिली .याप्रसंगी निवेदन देतांना श्री योगेश सनेर संचालक ग.स.जळगाव श्री धनराज वसंत बडगे जिल्हाकार्याध्यक्ष कास्ट्राईब कल्याण महासंघ महाराष्ट्र राज्य, माध्यमिक पतपेढीचे मा.चेअरमन भाऊसो आर .एच.बाविस्कर सर,श्री मंगेश भोईटे संचालक ग.स.जळगाव, श्री प्रविण आबाजी पाटील अध्यक्ष माध्यमिक मुख्याध्यापक संघ चोपडा , श्री प्रफुल्ल पाटील मुख्याध्यापक जि.प. काजीपुरा श्री डी.जे.पाटील सर, श्री सुनिल धनगर सर,श्री शिरसाठ सर,रावसो.श्री राजेश पाटील सर,श्री प्रमोद देवरे सर,श्री विवेक पाटील कें.प्र. कलाध्यापक संघाचे श्री पंजाबराव बाविस्कर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button