आत्माराम पाटील | आवाज मराठी, चोपडा | दिनांक २२/८/२०२३
चोपडा येथील हि मो करोडपती माध्यमिक विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक देवीलाल बाविस्कर यांच्या खानदेशच्या लोकनाट्य तमाशा (लोकसाहित्य व कला) लिखित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. या निमित्ताने लोककलावंत परिषदचे अध्यक्ष विनोद ढगे याची उपस्थिती होती.
विनोज ढगे यांनी आपल्या मनोगत यावेळी व्यक्त करतांना अनेक महत्वाचे विषय मांडले. यात खानदेशच्या लोकनाट्य तमाशा हे पुस्तक कलावंतांना प्रेरणा देणारे व मान सन्मान वाढवणारे असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यासाठी कलावांत हा समाजात प्रबोधन करण्यासाठी आपली कला सादर करतो म्हणून अश्या तमाशा कलावंतांचा समाजाने सन्मान केला पाहिजे. जेष्ठ तमाशा कलावंत भिमाभाऊ सांगवीकर, प्रा ए के गंभीर, कैलास बाविस्कर, हभप बापू महाराज, विजय करोडपती, खंडेराव बाविस्कर, प्रभाकर महाजन, यांनी आपले विचार मांडले.
यावेळी देविलाल बाविस्कर सर मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विट्ठल ओंकार पाटील होते. कार्यक्रमास चोपड्याच्या आमदार लताताई सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील, नगरसेवक अशोक बाविस्कर, माजी उपसभापती गोपाल सोनावणे, साहित्यिक राजेंद्र जी पारे, तमाशा मालक दत्तोबा सोनवणे, पद्माकर पाटील , गसचे संचालक मंगेश भोईटे, सतिष पठार, श्रीराम पालीवाल, पत्रकार आत्माराम पाटील, दिलीप पालीवाल, हिलाल व बारडे, संजय अहिरे व तमाशा कलावंत, शिक्षक, सामजिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र म्हैसरे यानी तर आभार के बी पाटील यांनी मानले.