आत्माराम पाटील | आवाज मराठी, चोपडा | दिनांक २०/८/२०२३
चोपडा तालुक्यातील लासुर परिसरात अवैध सागवान लाकूड जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. चोपडा वनविभागातर्फे करण्यात आलेल्या या कारवाईत १३ हजार रुपयांच्या किमतीचे लाकूड जप्त करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, लासूर -हिंगोणा रस्त्यावर असलेल्या नाल्यात ही कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. जमीर शेख उपवनसंरक्षक यावल वन विभाग जळगाव, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हडपे, परिक्षेत्र अधिकारी बी के. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
लासूर येथील वनपाल प्रशांत सोनवणे, वनरक्षक कृष्णापूर उत्तर व शासकीय वाहन चालक यांच्या समवेत लासूर महसूल हद्दीतील गावाच्या बाहेरील नाल्यात पाहणी केली असता, सागवान लाकडाचे चौपट नग २१ व गोल नग १ एकूण घनमीटर ०४.४०७ एकूण मालाची किंमत १३०२४ रूपये असून सदर माल जप्त करण्यात आला. मुद्देमाल शासकीय वाहनाने मुख्य विक्री केंद्र चोपडा येथे जमा करण्यात आले आहे. सदरची कारवाई लासूर वनपाल प्रशांत सोनवणे यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.