राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीचे पथक दाखल
जळगावातील नामवंत असलेल्या राजमल लखीचंद ज्वेलर्स या दुकानात चौकशी
टीम आवाज मराठी | जळगाव | जळगावातील राजमल लकीचंद ज्वेलर्सवर ईडीच्या पथकाकडून छापेमारी करण्यात आली. गेल्या २४ तासांपासून या ठिकाणीच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. या कारवाईनंतर आज पहिल्यांदाच राजमल लखीचंद ज्वेलर्सचे मालक राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार ईश्वर बाबूजी जैन हे माध्यमांसमोर आले. सीबीआयकडून फिर्याद दाखल करण्यात आली आहे व त्यांच्या फिर्यादीनुसार ईडीकडून ही कारवाई करण्यात आल्याचे ईश्वर बाबूजी जैन यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.
मुलाने स्टेट बँकेच्या विरोधात केसेस केल्या आहेत . त्याने त्या केसेस मागे घ्याव्यात, पण तो त्या केसेस मागे घेत नसल्यामुळे बँक तडजोड करायला तयार नाही. त्यामुळेच या कारवाईला सामोरे जावे लागत आहे. मात्र जे होईल ते कायद्यानुसार होईल, असे ईश्वरलाल बाबूजी जैन यांनी म्हटले आहे.
माझ्या नातवांच्या नावाने आलेले एंटरप्राइजेस नावाची कंपनी आहे, त्याचा आर. एल ग्रुप शी कुठलाही संबंध नाही. त्यांना जबाबदार सुद्धा धरलेले, ते स्वतंत्र असताना, असा असतानाही त्यांच्याशी संबंधित गोष्टी सुद्धा सिझ केल्या जात आहेत. हे चुकीचे आणि गैर त्यासाठी मला भांडाव लागणार आहे. १५ व १६ ऑगस्ट रोजी बँक बंद होते त्यामुळे रकमेचा भरणा झालेला नाही तसेच हिशोब सुद्धा लिहिला गेलेला नाही असे असतानाही ८७ लाख एवढी जी रोकड होती ती सुद्धा सीज करण्यात आली आहे. हे गैर आहे तसेच चुकीचे आहे. तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांकडून जी कागदपत्रे मागण्यात आली की आम्ही त्यांना दिलेली आहेत. तसेच आमची कुणाचीही चौकशी झालेली नाही आमचे जबाब घेतलेले आहेत त्यात मी असेल माझा मुलगा मनीष जैन असेल असे आमचे जबाब नोंदवले आहेत.
सोन्यावर कर्ज घेतले
कर्ज घेतेवेळी चार टक्के व्याज लावण्यात आले होते त्यानंतर काही दिवसांनी थेट ते १८ टक्के व्याजदर लावण्यात आले. थेट १४ टक्के व्याजदर हे जास्त लावण्यात आल्यामुळे मी जगायचे कसे, हाच माझा वाद स्टेट बँकेसोबत सुरू आहे. मी तडजोड करण्यासाठी त्यांना प्रपोजल दिले होते. हे कर्ज आहे, त्याची नऊ वर्षासाठी पुनर्बांधणी करा. मी व्याजासहित पैसे भरायला तयार आहे. मात्र त्यांनी माझा हा प्रस्ताव धुडकावून लावला, माझी तडजोड सुद्धा त्यांना मान्य नाही. मी सांगत असल्या गोष्टी त्यांना मान्य नाही. त्यांना तडजोड मान्य नाही कारण त्यांनी काही ठिकाणी चुका केल्या आहेत. काही ठिकाणी ते फसलेले आहे व या विरोधात माझा पुण्यातला मुलगा अमरीश याने त्यांच्यावर केसेस केलेले आहेत.
अमरीश यांनी ज्या केसेस केलेले आहेत त्या त्याने मागे घेतल्या पाहिजे तरच आम्ही तडजोड करू असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र केसेस मागे घेण्यासाठी अमरीश हा तयार नाही आणि त्यामुळे ते तडजोड करत नाहीये. त्यामुळे ठीक आहे ते तडजोड करत नाही म्हणून काय झाले जे व्हायचे आहे ते कायद्याने होईल. मात्र कायदेशीर रित्या तपासात ही जी आज कारवाई झाली ती चुकीची आहे.
माझे तसेच मुलगा मनीष जैन व त्याची दोन्ही मुले अशा सर्वांचे जबाब घेण्यात आलेले आहेत. यानंतर हे त्यांनी आम्हाला समन्स बजावलेले आहेत. जेवढे दागिने व रोकड असा जो स्टॉक होता तो सर्व त्यांनी सील केल्याचे ते म्हणाले.
काय म्हणाले जैन
– ईडीने आमचा जबाब घेतला आहे आणि मी ईडीला जबाब दिलेला आहे. त्यांनी आम्हाला समन्स देखील दिले आहेत. आम्ही चौकशीसाठी जाणार आहोत
-माजी आमदार मनीष जैन तसेच त्यांचे दोघे मुले व माझे जबाब ईडीने नोंदवून देखील आम्हला समन्स दिले आम्ही चौकशीसाठी जाणार आहोत.
– आमच्याकडे असलेल्या सर्व सोन, हे ईडीने ताब्यात घेतला आहे. ज्या फर्मर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे, ती आर.एल.फर्म माझ्या दोघे नातवांच्या नावावर आहे. त्यांचे बँकेच्या कर्जाशी काही देणेघेणे नाही म्हणून ही कारवाई चुकीची आहे.
– ही कारवाई राजकीय दबावापोटी आहे की नाही ते मी नाही सांगणार. शरद पवारांच्या पाठीशी असल्याने कारवाई झाली का, असे पत्रकारांनी जैन यांना विचारल्यानंतर माझे आणि शरद पवारांचे अनेक वर्षांपासून संबंध आहे अशी प्रतिक्रिया जैन यांनी दिली.
– माझे शरद पवारांशी अनेक वर्षांपासूनचे संबंध आहे मी शरद पवारांच्या पाठीशी राहणार.