लासुर परिसरातून विद्युत तारांची चोरी
आत्माराम पाटील, आवाज मराठी, चोपडा | दिनांक ५ ऑगस्ट २०२३
चोपडा तालुक्यातील लासूर ते हातेड रस्त्यावरील ज्ञानेश्वर जामराव पाटील यांच्या शेतातील ट्रान्सफॉर्मर वरिल अल्युमिनियम तार चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. एकूण ४१४० मिटर अॅल्युमिनियम चे तार हे ८२००० रूपये किंमतीचे विद्युत तारा अज्ञात व्यक्ती ने शुक्रवारी रात्री चोरीस नेल्याची घटना नुकतीच घडल्यामुळे शेतकर्यांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान सदर घटना ज्ञानेश्वर पाटील यांच्या सकाळी शेतात गेल्यावर लक्षात आली. त्यांनी सदर घटनेची माहिती लासूर येथील सब स्टेशन च्या लखीचंद शेडगे (वरिष्ठ तंत्रज्ञ लासूर कक्ष) यांना भ्रमणध्वनी द्वारे कळविले याबाबत त्यांनी स्वतः घटना स्थळी येवून पाहणी केली असता. कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी हि जबरी चोरी केली असावी. असा अंदाज लावला आणि त्यांनी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात जावून रितसर गुन्हा नोंदवला असून पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवाजी बाविस्कर हे पुढील तपास करीत आहे.
दरम्यान, मागे सुध्दा उन्हाळ्यात चक्क ट्रान्सफॉर्मर चोरून नेल्याची घटना सुध्दा घडली आहे. म्हणून तालुक्यात तर मोठी टोळी सक्रिय तर नाही ना.? असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. म्हणून एवढी मोठी विद्युत तारांची चोरी केल्याची पहिलीच घटना घडल्यामुळे शेतकर्यांमध्ये साहजिकच भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे पोलिसांसमोर एकच आवाहन ऊभे राहिले आहे.