महसूल सप्ताह निमित्त सि. बी. निकुंभ विद्यालय, घोडगाव येथे युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन
महाराष्ट्र शासन महसूल विभाग मार्फत दिनांक १ ऑगस्ट २०२३ पासून ७ ऑगस्ट २०२३ या कालावधीत महसूल सप्ताह चे आयोजन
टीम आवाज मराठी आत्माराम पाटील धरणगांव प्रतिनिधि | ३ ऑगस्ट २०२३ | महाराष्ट्र शासन महसूल विभाग मार्फत दिनांक १ ऑगस्ट २०२३ पासून ७ ऑगस्ट २०२३ या कालावधीत महसूल सप्ताह चे आयोजन करण्यात आले आहे त्यानिमित्ताने चोपडा तहसिल कार्यालय अंतर्गत मंडळ भाग हातेड च्या वतीने भाऊसाहेब थोरात, तहसीलदार चोपडा यांचे मार्गदर्शन खाली युवा संवाद कार्यक्रम चे आयोजन सी. बी. निकुंभ विद्यालय घोडगाव येथे करण्यात आले होते. सदर कार्यक्रम साठी प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी चोपडा तालुका एकनाथ बंगाळे, तहसीलदार चोपडा भाऊसाहेब थोरात, चोपडा तहसिल कार्यालयातील नायब तहसिलदार सचिन बांबळे, सि . बी. निकुंभ विद्यालयाचे पदाधिकारी, मुख्याध्यापक राजेंद्र चौधरी , पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षककेतर कर्मचारी तसेच घोडगाव गावातील विविध संस्था चे पदाधिकारी, हातेड भागाचे मंडळ अधिकारी रवींद्र माळी, तलाठी आर के पाटील, संतोष कोळी, वंदना कोळी, गजानन पाटील, आशिष निचित, हमीद पठाण उपस्थित होते. प्रमुख अतिथी यांच्या स्वागताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी यांचे हस्ते सरस्वती माते च्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रम ची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर गजानन पाटील, तलाठी बुधगाव यांनी कार्यक्रम चे प्रस्तावित केले. प्रमुख पाहुणे यांचे शाळेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच हातेड मंडळ भागाच्या वतीने मंडळ अधिकारी, सर्व तलाठी यांनी फुलांचे रोपं देऊन मान्यवरांचे स्वागत केले. सदर कार्यक्रमात इयत्ता ९वी ते १२ चे विद्यार्थी उपस्थित होते. ज्या विध्यार्थ्यांचा जन्म १ ऑक्टोबर 2005 पूर्वीचा आहे त्या सर्वांचे मतदार यादीत नाव नोंदण्यासाठी नमुना ६अ चा फॉर्म भरून घेण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचे हस्ते विविध शैक्षणिक दाखले वाटप करण्यात आले. घोडगाव व वडोदा गावातील पिकपाहनी करणारे स्वयंसेवक यांचा गुलाब पुष्प देऊन उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व सर्व मान्यवर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. प्रस्तुत कार्यक्रम प्रसंगी नायब तहसिलदार सचिन बांबळे यांनी युवकांना मार्गदर्शन केले. तहसीलदार चोपडा भाऊसाहेब थोरात यांनी विध्यार्थ्यांशी संवाद साधून आपण शेतकऱ्यांची मुले आहात, सातबारा कसा असतो ते बघा, त्यावरील नाव, क्षेत्र, धारणा प्रकार, पिकपाहनी कुठे लावतात याबाबत सविस्तर माहिती सांगितली.
तसेच विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालय, पोलिस ठाण्यात, तलाठी कार्यालय अश्या विविध शासकीय कार्यालयात जाऊन कोणत्या कार्यालयात काय काम चालते, त्याची कार्यपद्धती कशी असते याची माहिती करून घ्यावी. असे आवाहन करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. रवींद्र माळी, मंडळ अधिकारी यांनी विविध शासकीय दाखले, प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रे जोडावी लागतात याबाबत सविस्तर माहिती दिली तसेच त्याच्या प्रती शाळा प्रशासन ला उपलब्ध करून देण्यात आल्या. उपविभागीय अधिकारी एकनाथ बंगाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ई पिकपाहनी कशी करावी याबाबत विस्तृत असे मार्गदर्शन केले. तसेच पिकपाहनी स्वतः शेतकऱ्यांनी लावली तर त्याचे फायदे व तोटे याबाबत माहिती सांगितली. बहुतेक विद्यार्थी हे शेतकरी यांची मुले असल्याने सर्व विद्यार्थ्यांनी आई, वडील, भाऊ, काका, शेजारी या शेतकऱ्यांना पिकपाहनी करण्यासाठी मदत करावी, त्यासाठी स्वतः शेतात जावे व पिकपाहनी करून द्यावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केले. शेवटी आशिष निचित तलाठी, हातेड यांनी सर्व मान्यवर, शाळा प्रशासन यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिऱ्हाडे यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र चौधरी, मुख्याध्यापक, रवींद्र माळी, मंडळ अधिकारी हातेड भाग, संतोष कोळी, वंदना कोळी, आशिष निचित, आर के पाटील, गजानन पाटील, हमीद पठाण व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.