टीम आवाज मराठी, नंदुरबार। २१ जून २०२३ । कापूस विक्री केलेल्या शेतकऱ्यांना देण्यासाठी आपल्या कॉटन जीनच्या कार्यालयातील कपाटात ठेवलेले व्यापाऱ्याची तब्बल सडेपंधरा लाखाची रोकड अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याने खळबळ उडाली आहे. हि घटना शहादा शहरातील श्रीराम काॅटन फायबर जिनिंग मिलमध्ये घडली असून याप्रकरणी व्यापाऱ्याच्या फिर्यादीवरून शहादा पोलिसात अज्ञाताविरूद्ध गून्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शहादा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील रोहीदास पाटील (वय ५८) रा.गायत्री पार्क, लोणखेडा (ता शहादा) यांचे शहाद्यात श्रीराम काॅटन फायबर जिनिंग मिल आहे. या मिल अंतर्गत श्री.पाटील हे विविध ठिकाणाहून आलेल्या शेतकऱ्यांकडून कापसाची खरेदी करतात. हंसाचं कापूस खरेदीचे शेतकऱ्यांसाठी देण्याकरिताची १५ लाख ५३ हजाराची रोकड त्यांनी आपला शहादाच्या ऑफिसमधील ड्रावर व एका छोट्या कपाटामध्ये ठेवली होती.
सदर रक्कम अज्ञात चोरट्यांने ऑफिसचा दरवाजा उघडून आत प्रवेश करून चोरुन नेली आहे. याबाबत सुनील पाटील यांनी शहादसा पोलिसात फिर्याद दिली असून भादवि कलम ३८० प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोसई छगन चव्हाण करीत आहेत.