खामखेडा जनता विद्यालयात विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचा संकल्प….
खामखेडा जनता विद्यालयात विज्ञान छंद मंडळ स्थापन
टीम आवाज मराठी महेश शिरोरे नाशिक देवळा प्रतिनिधी | २ ऑगस्ट २०२३ | नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यांतील खामखेडा येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी विज्ञान छंद मंडळाची स्थापना करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर.जी.पानसरे सर होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. विज्ञान समिती प्रमुख थोरात आय. जी. यांनी प्रास्ताविकातून विज्ञान छंद मंडळ स्थापन करण्यामागचा उद्देश स्पष्ट करत विद्यार्थ्यांच्या अंगी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा व विज्ञानाने केलेली प्रगती याबद्दल माहिती दिली.सदर कार्यक्रमाचे नियोजन विज्ञान छंद मंडळ समिती प्रमुख रौंदळ वाय.बी.,आहेर आर.एच., श्रीमती सोनवणे एस. बी., आय. जी थोरात, बी वाय सोनवणे, आर के पाटील यांनी केले या विज्ञान मंडळ समिती मध्ये अध्यक्ष – राजनदिनी निवृत्ती बिरारी, उपाध्यक्ष – प्रज्वल महेश शिरोरे
सेक्रेटरी – प्रांजल प्रशांत शेवाळे खजिनदार – वैष्णवी नानाजी निकम व प्रत्येक वर्गातील दोन विद्यार्थ्यांची या मंडळ समिती मध्ये निवड करण्यात आली.या मंडळ समितीच्या निवडीचे मुख्याध्यापक पानसरे, व सर्व शिक्षकांनी त्यांचे स्वागत केले. तर सदर कार्यक्रमासाठी फलकलेखन कुवर एच.एन.यांनी केले.