टीम आवाज मराठी मुंबई प्रतिनिधि | २६ जुलै २०२३ | (व्हिडीओ सौजन्य महाराष्ट्र विधानसभा टीव्ही) महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशनात जुलै आॉगस्ट २०२३ येथे आज रोजी आमदार सुरेश दामू भोळे (राजुमामा) यांनी जळगांव शहरात दि.७ जुलै रोजी झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे शहरातील तांबापुरा व इतर परिसरात तसेच रावेर तालुक्यात अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली होती. या पुराचे पाणी अनेक घरांमध्ये शिरल्याने अनेक जीवनावश्यक वस्तुंचे तसेच घरांचे नुकसान यात झालेले दिसून आले. यासंदर्भात जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देण्यात आले तेव्हा त्यांच्या वतीने असं सांगण्यात आले की निकषात ४८ तास सलग पाऊस असेल तरच मदत करता येथे. परंतु पाऊस हा मोठ्या प्रमाणावर पडल्यामुळे येथील घरांचे आणि वस्तूंचे नुकसान झालेले आहेत.
तरी यासंदर्भात शासनाने निकषात बदल करुन नुकसानग्रस्त भागात त्वरित मदत करावी अशी विनंती आज जळगांव शहराचे आमदार मा.राजुमामा भोळे यांच्या वतीने विधानसभेत करण्यात आली.