अमित उद्यान रत्न पुरस्काराने शेतकऱ्यांचा गौरव
जैन हिल्स येथील राष्ट्रीय फलोउत्पादन परिषदेचा समारोप
टीम आवाज मराठी जळगाव | ३० मे २०२३ | नवी दिल्ली येथील अमितसिंग मेमोरियल फाउंडेशन व जैन इरिगेशन सिस्टिम्स् लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने जैन हिल्स येथे राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेचा आज (ता. ३०) समारोप झाला. समारोप सत्रात देशभरातील २१ शेतकऱ्यांचा अमित उद्यान रत्न पुरस्कार – २०२३ ने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. बिजय कुमार उपस्थितीत होते. त्यांच्यासोबत चाई (कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टीकल्चर असोसिएशन ऑफ इंडिया) चे अध्यक्ष डॉ. एच. पी. सिंग, सौ. बिमला सिंग, अमरेंदर सिंग, डॉ. बिर पाल सिंग, डॉ. एस. के. मल्होत्रा, डॉ. जे. एस., परिहार, डॉ. अनिल ढाके, डॉ. के. बी. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला शहिद अमितसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते अॅवार्ड पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
प्रास्ताविक डॉ. के. बी. पाटील यांनी केले. त्यात त्यांनी १५ वी स्वदेशी जागृती संगोष्टी व अमितसिंग मेमोरियल फाऊंडेशनविषयी माहिती दिली. डॉ. जे.एस. परिहार यांनी आभार मानले. सुत्रसंचालन डॉ. प्रज्योत नलिनी, डॉ. व्ही. आर. सुब्रम्हणिअम यांनी केले.
डॉ. एच. पी. सिंग यांनी राष्ट्रीय फलोउत्पादन परिषदेच्या तीन दिवसांच्या कामकाजाचे निष्कर्ष शेतकरी, अभ्यास व शास्त्रज्ञांसमोर मांडलेत. कृषी क्षेत्रात प्रिसीजींग फार्मिग किती महत्त्वाचे यावर त्यांनी प्रकाश टाकला. वारंवार होणाऱ्या वातारणातील बदलांमुळे नैसर्गिक आपत्तींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पिकांचेही खूप नुकसान होत आहे. यासाठी संशोधकांनी नॅनो तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले पाहिजे. यासाठी संशोधकांनी कमीत कमी कालावधीत संशोधनाला चालना दिले पाहिजे. शेतातील मुख्य पिकाची मूल्यवृद्धी करून नवीन उत्पादनांची श्रृखंला शोधली पाहिजे. शेतातील टाकाऊपासून काही टिकाऊ उत्पादन घेता येऊन शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात वाढ होईल अशा शिफारशी समोर आल्यात. प्रिसीजन मॅकेनिझम महत्त्वाचे असून शेतकऱ्यांमध्ये त्यादृष्टीने जागृता आणणे. जे पर्यावरण, जमीन, पाणी आपल्याला मिळाले त्यापेक्षाही अधिक सुपिक जमिन, चांगले पर्यावरण पुढच्या पिढीकडे हस्तांरीत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची चर्चा समोर आली. वातावरणांच्या बदलांमध्ये जे वाण टिकेल अशा उच्च गुणवत्तेच्या बियाणांची निर्मीती करणे. भौगौलिक मानांकनासह व्हायरस नियंत्रण ठेवण्यासाठी माहितीचे आदान प्रदान करण्याची सक्षम यंत्रणा उभारणे. शेतमाल काढणी पश्चात व्यवस्थापनावर सकारात्मक यंत्रसामुग्रीचा विचार करणे यातून निर्यातीच्यादृष्टीने आंतरराष्ट्रीय मानांकनांसह शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करणे अशा विविध विषयांवर तिन दिवसीय राष्ट्रीय फलोद्यान परिषदेमध्ये विचारमंथन झाल्याचे डॉ. एच. पी. सिंग यांनी सांगितले. डॉ. एस. के. मल्होत्रा यांनीही राष्ट्रीय फलोद्यान परिषदे दिशादर्शक ठरली असून आलेल्या शिफारशींवर काम करणार असल्याचे सांगितले. अमेंदर सिंग, बिमला सिंग यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. बिजय कुमार यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सांगितले की, सकस आहारासाठी निकोप पर्यावरण हवे. यातून नैसर्गिक शेतीला प्राधान्य दिले पाहिजे. अतिरिक्त फवारणी, खतं, पाणी न देता कमी वेळेत, कमी संसाधनांमध्ये उत्कृष्ट शेती केली पाहिजे. ठिबक तंत्रज्ञानातून पाणी बचत होतच यातूनच वॉटर सोल्युबल खते आवश्यक मात्रांमध्येच दिली पाहिजे. यामध्ये जैन इरिगेशन सिस्टीम कंपनीचे सुरू असलेले कार्याचे कौतूकही डॉ. बिजय कुमार यांनी केले.
अमित सिंग उद्यान रत्न पुरस्कारार्थी
शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकारचे पुरस्कार मानसन्मान केले जातात. त्यात देशभरातील खालील शेतकरी व शास्त्रज्ञांचा सन्मान करण्यात आला. सोनू निगम कुमार, आनंद कुमार ठाकूर,रामकिशोर सिंग मुजफरपूर, नारायण महातो रोसेरा बिहार, दत्तात्रय विठ्ठल माळी सोलापूर, ईश्वर सुदाम पाटील नंदुरबार, जगदीश बाबुलाल जाठ बडवाणी मध्यप्रदेश, रितेश प्रकाश पाटील बुऱ्हाणपूर, राज गोंडा पाटील सांगली, सौ. राजेश्री दिपक पाटील जळगाव, नारायण शशिकांत चौधरी यावल, रामदास त्र्यंबक पाटील जळगाव, मनोज जानरावजी जवांजल नागपूर, मयूरभाई कानाभाई पिंप्रोतर सुरेंद्रनगर गुजराथ, धर्मेंद्र सिंह विरेंद्रसिंह चौहाण नर्मदा गुजराथ, अण्णासाहेब हरीभाऊ माळी चांदवड नाशिक, राजू रामदास पाटील जामनेर, ईरण्णा डी. हल्ली बिजापूर, सौ. पुर्णा चेरल्ला विकराबाद तेलंगणा, अभिषेक आनंद सितामढी बिहार, जयपाल सिंग पानिपत हरियाणा यांचा अमित सिंग उद्यान रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप हे शाल, श्रीफळ, स्मृती चिन्ह, रोख पारितोषीक असे होते. दरम्यान शेतकऱ्यांची क्विज स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये राम किशोर बिहार, अनिल सपकाळे जळगाव, मनोज जवांजळ नागपूर विजयी झालेत त्यांचाही गौरव करण्यात आला. उत्कृष्ट सादरीकरण केल्याने डॉ. ए. आर. मेंढे, डॉ. हेमंत पाटील, डॉ. सुमरेसिंग पाटील, डॉ. आर. सुधा, डॉ. स्वाती, डॉ. अनिल चौधरी, डॉ. शर्मिष्ठा नायक, डॉ. बी. डी. जडे, डॉ. रश्मी कुमार यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.